Monday, January 16, 2017
Saturday, June 28, 2014
कॉलेजियन्सचा दिवाळी कट्टा 28 Oct 2010, 1233 hrs IST
' चला, दिवाळी जवळ आली. कामाला लागा...' अशी हाक आईने दिल्यामुळे तमाम कॉलेजियन्स सध्या घरात दिवाळीची तयारी करण्यात गुंतलेले आहेत. परीक्षा संपल्यामुळे 'रिकामटेकडे' झालेले हे कॉलेजियन्स घरातल्या खोल्यांमध्ये मुक्त संचार करताहेत. एरव्ही सुट्टीतही कट्ट्यांवर दिसणारी ही मंडळी सध्या घराची साफसफाई, रंगरंगोटी, फराळाची तयारी करण्यात बिझी आहेत. त्यामुळे सगळे कट्टेही ओस पडलेले दिसताहेत.
सकाळी उठून घरातली साफसफाई त्यानंतर दुपारी फराळाला मदत आणि संध्याकाळी 'अत्यावश्यक' वस्तूंची खरेदी असा कॉलेजियन्सचा सध्याचा दिनक्रम आहे. अगदी स्वत:चा खण आवरण्यापासून ते घरातल्या माळ्यावर चढून साफसफाई करेपर्यंत या मंडळींनी मजल मारली आहे. काहींसाठी ही कामं त्यांच्यावर घरच्यांनी लादलेली आहेत, तर काहीजणांना त्यात मजा येतेय. आरकेटी कॉलेजमध्ये एसवायबीएस्सी करणाऱ्या विरेंद महाजन आणि त्याच्या मित्रांनी प्रत्येकाच्या घरात आळीपाळीने रंग लावण्याचं ठरवलंय. तर मॉडेल कॉलेजचा सुशील पाटील घराचं रंगकाम करण्यात वडिलांना मदत करतोय.
घरात उत्साहाने अशी कामं करायला तयार होण्यामागे (किमान तसा उत्साह दाखवण्यामागे) या मंडळींची खास कारणंही आहेत. खरेदीचं अर्थकारण यामागे असल्याचं कॉलेजियन्स आवर्जून सांगतात. काम पूर्ण केल्यावर खरेदीच्या वेळी आपल्या मनाजोगी खरेदी करता येते. अगदी कपड्यांपासून बाईकपर्यंत आणि मोबाइलपासून लॅपटॉपपर्यंतच्या मागण्या पूर्ण करून घेता येतात, असं अनेक विद्यार्थ्यांना वाटतं. घरातल्या घरात एक प्रकारची एक्सचेंज ऑफरच असते ही.
एकीकडे झाडलोट, रंगरंगोटी करण्यात मुलं बिझी असतानाच कॉलेजमधल्या तमाम मुली सध्या किचनमध्ये आईला फराळ करण्यात गुंतलेल्या आहेत. कढईमध्ये पीठं भाजण्याचे दिवस सुरू झाले आहेत. सुट्टी लागल्यामुळे घरातल्या कामांमध्ये मदत करणं सुरू झालंय. मला मुळातच घरकामाची आवड असल्याने पूर्ण घराची साफ-सफाई करणं, फराळ बनवण्यात हातभार लावणं ही कामं मी आवडीने करते, असं पंेढारकर कॉलेजमध्ये टीवायबीकॉमला शिकणारी मधुरा कुलकणीर् सांगते. स्वखुशीने अशा कामांमध्ये झोकून देणाऱ्या मुलींची संख्या तशी फारशी नसली तरी पर्याय नसल्यामुळे त्यात आनंद मानायला लागतोय. रांगोळ्यांचा बॉक्स शोधून काढणं, नवीन डिझाइन्स बघणं, पणत्या रंगवणं अशा कामांचा 'अभ्यास' आता सुरू झालाय.
घरातल्या तयारीबरोबरच काही जण चक्क आई-वडिलांबरोबर खरेदीला जायला लागले आहेत. ही खरेदी स्वत:साठी नसून घरच्या जिन्नसांची आणि परमपूज्यांच्या कपड्यांची आहे. त्यामुळे 'मी संध्याकाळी ७ वाजता स्टेशनवर भेटेन. तयार रहा. आज ड्रेस मटेरियल घेऊनच टाकू,' असे संवाद वडीलधारे आणि आपले कॉलेजियन्स यांच्यात घडत आहेत. कटिंग पीत कट्ट्यावर गप्पा हाणण्याच्या संध्याकाळच्या वेळी ही मुलंमुली हातात दोन-दोन पिशव्या घेऊन खरेदीला जाताना दिसताहेत. फक्त कपड्यांपुरतीच मर्यादित असणारी त्यांची शॉपिंग दिवाळीच्या निमित्ताने पडदे, चादरी, उशांचे अभ्रे इतकंच काय पण, कपबशा, भांड्याकुंड्यापर्यंत जाऊन पोहोचलीय.
- श्रीकांत सावंत,
मीनाक्षी कुलकर्णी
( कॉलेज क्लब रिपोर्टर)
Wednesday, October 10, 2012
Monday, May 2, 2011
Gudhipadwa article- aamod gadre- pardeshatil yashaswi tarun
"टूनपूरचे मराठी सुपरहिरो"
वर्षाचा शेवटचा महिना उजाडलाय, सगळीकडे उत्साहाचं, सेलिब्रेशनच वातावरण आहे. मग यात 'बॉलिवूड' तरी कसं मागे राहील? “ टूनपूर का सुपरहीरो” या चित्रपटाच्या निमित्ताने या वर्षाअखेरीस "३डी अॅनिमेशन आणि लाईव्ह अॅक्शन" असा एक वेगळा प्रयोग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आणि या चित्रपटाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाची जान असलेलं ' अॅनिमेशन वर्क' करणारे सर्व अॅनिमेटर्स मराठी असून हॉलिवूडच्या तोडीस-तोड हा चित्रपट बनला आहे. "क्लाईंब मिडीयाच्या किरीट खुराणा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून कंपनीतील त्यांचे सहकारी अरूण माने, प्रशांत शिकारे, रविराज कुंभार आणि अरविंद शिर्के यांनी अॅनिमेशनची धुरा आपल्या खांद्यावर यशस्वीपणे सांभाळली आहे.
ब्लॉकमध्ये किरीट खुराणा (दिग्दर्शक) - हा चित्रपट म्हणजे आम्हा सर्वांसाठी एक मोठ आव्हान होतं, कारण एक तर अतिशय मोजक्या लोकांच्या सहायाने काम पूर्ण करायच होत . हॉलिवूड सारख्या सगळ्या नवीन टेक्नॉलॉजीही आमच्याकडे उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे हा चित्रपट बनवण्यात आमच्या अॅनिमेटर्सनी सिंहाचा वाट उचलला आहे. दिवस-रात्र मेहनत करून, कधीकधी माझा ओरडा खाऊन, मूड सांभाळून घेतला पण कोणीही बॅक-आऊट नाही केलं, आणि त्यामुळेच हे अवघड आव्हान पेलणं सोप झालं.
या चित्रपटावर गेली ३ वर्ष काम करणारे आणि चित्रपटाच 'प्री-प्रोडक्शनच' , कॅरॅक्ट् र डिझाईनिंग, सीनची लांबी, म्हणजेच शूट होण्यापूर्वी करावी लागणारी पूर्ण तयारी वगैरे सर्व व्यवस्थित सांभाळणारे प्रशांत शिकारे, 'क्लाईंब मिडीया'मध्ये गेली ५ वर्ष काम करत आहेत. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे त्यांना अॅनिमेशनच तंत्रशुध्द प्रशिक्षण घेता आलं नाही, पण तरीही या क्षेत्रा त पाऊल टाकल्यावर अनेक गोष्टी शिकत, आत्मसात करत, तर कधी चुका करत ते इथवर पोचले आहेत. 'टूनपूर'बद्दल ते सांगतात की या चित्रपटात " एक ५४ सेकंदाचा सीन आम्हाला सलग( १ टेक ओके) करायचा होता, आणि त्यावेळेस माझी खरी परीक्षा होती, कारण मी आत्तापर्यंत फक्त जाहि रातींसाठी अॅनिमेशन केले होतं, चित्रपटसाठी अॅनिमेशन हा एक नवीन अनुभव होता. मग सीन कसा शूट होणार, कॅमेरा अँगल्स, या सगळ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला आणि तो सीन "१ टेक ओके" केला. हा माझ्यासाठी एक वेगळा आणि आत्मविश्वास देणारा अनुभव होता.
चित्रपटातील 'प्री-प्रोडक्शनच' (pre – production) च्या कामात प्रशांतला मदत करणारा आणि अॅनिमेटेड कॅरॅक्टर्सचे (पात्रांचे) रंग, कपडे, वेशभूषा आणि चित्रपटाती सर्व भागांच कलरिंग सांभाळणारा कोल्हापूरचा रविराज कुंभार हा लहानपणापासूनच खूप सुंदर चित्र काढायचा. घरी सगळेजण कलाकार असल्याने पोषक वातावरणही होते. त्यामुळे त्याने 'कोल्हापूरच्या' कलानिकेतन महाविद्यालयातून ‘फाईन आर्ट्सचा’ ५ वर्षांचा कोर्स पूर्ण केला आणि गेली ३ वर्ष तो 'Climb Media' मध्ये काम करतोय. सेट मॅक्स चॅनलवरचा दिवाना टायगर, अॅतक्शन अण्णा, ब्रिटानिया टायगर अशा अनेक ' निमेटेड' जाहिराती प्रशांतच्या सहाय्याने करणार्या रविराजला 'टूनपूर' मुळे मोठा ब्रेक मिळालाय. यातली सगळी 'अॅनिमेटेड' characters ही आजूबाजूच्या परिसरातल्या आधारलेल्या लोकांवरूनच (observation) करून घेतली आहेत. आणि त्यामुळे त्यांचे कपडे - बोलणं, चालणं, अगदी खरंखुरं वाटतं, ह्याच श्रेय रविराजच्या 'निरिक्षण शक्तीलाच' जातं.
अॅनिमेशन क्षेत्रात गेल्या १३ वर्षांपासून असणारे "अरुण माने" हे "क्लाईंब मिडीया"चे ३डी स्टुडियो प्रमुख तर आहेतच पण या चित्रपटासाठी 'टेक्निकल डिरेक्टर ' म्हणूनही त्यांनी कम पाहिलय. याबद्दल ते सांगतात, अतिशय कमी लोकांना बरोबर घेऊन एवढ्या मोठ्या लांबीचा चित्रपट तयार करणं हे आमच्यासाठी एक आव्हानच होतं. पण तरीही हे आव्हान पेलून एकीकडे या चित्रपटावर(जे आमच एक स्वप्न आहे) काम करत, आम्ही आमच्या नेहमीच्या क्लायंट्सची कामही यशस्वीपणे पूर्णही केली.
या क्षेत्रात येणार्यांनी (तरुणांनी) हे लक्षात ठेवलं पाहिजे की, झोकून देऊन काम करता यायला हवं... जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या प्रोजेक्ट्वर काम करत असता तेव्हा फक्त ढोर मेहनत करून चालत नाही, तर तुम्हाला तुमच काम अतिशय कल्पकतेने आणि हुशारीने करता यायला हवं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 'संयम' बाळगणे. आपण खूप मेहनत करून एखाद काम पूर्ण करतो, पण ते समोरच्याला आवडेलच असं नाही अशा वेळेस जो निराश न होता तितक्याच प्रयत्नपूर्वक आणि कामाची गती वाढल्यावरही झोकून देऊन काम करतो तो नक्कीच यशस्वी होतो.
तुमची जर मनापासून भरपूर मेहनत केलीत, तर तुम्हाला यश हमखास मिळतेच, हे या तिघाही मराठी तरुणांच्या उदाहरणावरून हे नक्कीच सिद्ध होत.
ब्लॉक मध्ये (अरविंद शिर्के)- बॅकबोन ऑफ कंपोझिशन डिपार्टमेंट - क्लाईंब मिडियाचे संस्थापक भीमसेन खुराणा यांच्याबरोबर सुरुवातीपासून काम करणारे अरविंद शिर्के कंपोझिशन डिपार्टमेंटचे आधारस्तंभ आहेत. गेल्या २०-२५ वर्षातील तंत्रज्ञानाचा प्रवास जवळून पाहिलेले शिर्के सांगतात, पूर्वी आम्हाला एक सीन शूट करून त्याच एडिटिंग पूर्ण करायला १-२ दिवस सहज लागायचे, पण तेच काम आता अर्ध्या तासाच्या आतच होत. या चित्रपटाबद्दल ते म्हणतात की आधी आमच्या कंपनीने बर्याच अॅनिमेटेड जाहिराती बनवल्या आहेत, पण आता पहिल्यांदाच आम्ही एवढ्या मोठ्या लांबीची ३डी आणि लाईव्ह अॅक्शन फिल्म बनवली आहे. अवघ्या १०-१५लोकांच्या सहाय्याने हे काम करणं म्हणजे एक आव्हानच होतं, पण तरीही या सगळ्या मुलांनी खरच खूप उत्तम काम करून, 'सुंदर' साँग बनवलय, यात शंकाच नाही. (25/12/2010)
Ubharti Tarunai
women's day Article on Mayuri Apte
" प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे" अशी एक म्हण आहे, आणि असेच अथक प्रयत्न करून जिद्दीने आपल्या पायांवर यशस्वीपणे उभी राहून दाखवणार्या मयुरी आपटे या मूक-बधिर, पेंढारकर महाविद्यालयात "बी.एस्स.सी"च्या तृतीय,वर्षाला शिकणार्या तरुणीचा परवा भारताचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते "अलौकिक प्रतिभा" पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
डोंबिवलीत लहानाची मोठी झालेल्या मयुरीला लहानपणापासूनच ऐकू येत नव्हते, पण तरीही तिच्या पालकांनी तिच्या बालपणीच्या जडणघडणीत मोठा वाटा असलेल्या बागुल मॅडम यांच्या सल्ल्याने इतर मुलांसारखीच वागणूक दिली, आणि तिला एखाद्या विशेष शाळेत न घालता "स्वामी विवेकानंद, दत्तनगर" इथल्या (नॉर्मल) मुलांच्या शाळेतच तिने १०वी पर्यंत यशस्वीपणे शिक्षण पूर्ण केलं. तिच्या या प्रवासाबद्दल तिची आई माधुरी आपटे सांगत असतात, 'मयुरीचा हा आमच्या आणि तिच्या आणि आमच्यासाठीही सोपा नव्हता. ती दीड वर्षांची असताना आम्हाला तिच्या आजाराबद्दल लक्षात आलं, हॉस्पिटलमध्ये जाऊन चेकिंग केल्यावर कळलं की ऐकू येण्याच्या काही नसा दाबल्या गेल्या आहेत, आणि त्यावर काही कायमस्वरुपी इलाज नसल्याने 'श्रवणयंत्राच्या' सहाय्याने तिने पुढे वाटचाल सुरु ठेवली. तस बघायला गेलं तर शाळांमधे अशा मुलांसाठी बर्याच सवलती असतात, त्यांना रेग्युलर (भाषा)लँग्वेजेस शिकणं कठीण पडतं म्हणून चित्रकला, टायपिंग असे तुलनेने अनेक सोपे विषय अभ्यासाला मिळतात. पण आम्ही तिला नॉर्मल मुलांच्या शाळेत घालतानाच ठरवलं होतं की कोणतही कन्सेशन न घेता रेग्युलर शिक्षण पूर्ण करायचं. आणि त्याप्रमाणेच तिने बरीच मेहनत घेऊन, शिक्षक आणि मित्र-मैत्रिणींच्या मदतीने अभ्यास करून १०वीला७४% मिळवले.
पण त्यानंतरचा प्रवास थोडा जास्त खडतर होता, मयुरी हातवारे करत, थोडफार बोलायचा प्रयत्न करत सांगत असते. ' पेंढारकर कॉलेजमध्ये सायन्सला अॅडमिशन घेतली खरी, पण पहिले ३-४ महिने खूप कठीण होते. नवीन अभ्यासक्रम, शिक्षक, विद्यार्थी सगळेच नवीन, कोणीच मित्र-मैत्रीणी नाहीत, कोणालाच माझ्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. . आणि तेव्हा एका विषयासाठी ३-४ वेगवेगळे शिक्षक होते. त्यामुळे पहिले काही दिवस आई रोज माझ्याबरोबर कॉलेजला यायची, माझ्या शिक्षकांना , वर्गातल्या इतर मुलांना भे टून ओळख करून द्यायची, अस करत करत मग मी हळूहळू तिथे सेटल होत गेले . आणि गेल्या पाच वर्षात मला एकदाही एकटं वाटल नाही, सगळ्या शिक्षकांनी, माझ्या मित्र-मैत्रिणींनी खूप सांभाळून घेतलं, लेक्चरमध्ये, अभ्यासात खूप मदत केली. कॉलेजमध्येपण आम्ही सगळ्या स्पर्धांमध्ये, फेस्टीव्हल्समध्ये ,मध्ये खूप धमाल केली, आणि ही ५ वर्ष कशी निघून गेली कळलंही नाही.
अभ्यासाबरोबरच मयुरीला वाचनाचीही खूप आवड आहे. वेगवेगळ्या लेखकांची आत्मचरित्र वाचणं तिला जास्त आवडतं. 'एक होता कार्व्हर', ' इडली, ऑर्किड आणि मी', ' अग्निपंख' ही तिची विशेष आवडती पुस्तकं . या २-३ पुस्तकांची तर मी अक्षरशः पारायण केली आहेत. माणसाने किती प्रयत्नशील असावं, परिस्थितीवर मात करून कस पुढे जायचं, यशस्वी व्हावं, हेच या पुस्तकांनी मला शिकवलं.
माजी राष्ट्रपती अब्दुल कलामांकडून पुरस्कार मिळणार आहे हे जेव्हा तिला कळलं , तेव्हा खर तर ती थोडी घाबरलीच, नर्व्हस झाली. मला का हा पुरस्कार मिळतोय? मी अस काय मोठ यश मिळवलय, जे काही केलं ते तुम्हीच ( आई-वडिलां नी) केलेल्या प्रयत्नांमुळे आहे. पण नंतर मी तिला कारण सांगितल की, '२०११ हे वर्ष "ईयर ऑफ केमिस्ट्री" म्हणून घोषित करण्यात आलयं. त्यामुळे हा पुरस्कार देण्यासाठी 'केमिस्ट्री'मध्ये यश मिळवलेल्या एका यशस्वी तरुणीचा ३ महिने शोध घेऊन 'आरोहण' संस्थेने ह्या पुरस्कारासाठी तुझी निवड केली आहे. ह्या सत्कारामुळे तुझ्यासारख्या अनेक मुलांना आणि त्यांच्या पालकांना प्रेरणा मिळेल, तेही त्यां च्या पायांवर स्वतंत्रपणे उभे राहून एक यशस्वी जीवन जगू शकतील. हे सांगून आई-बाबांनी मला हेही बजावल की ' हा पुरस्कार तुझ्या मेहनतीच बक्षीस आहे, पण म्हणून हुरळून न जाता, पाय जमिनीवरच ठेऊन पुढच लक्ष्य गाठ आणि यशस्वीपणे पुढे जात रहा.'
तिच्या या जिद्दीला आमचा सलाम आणि पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..!!
My articles some are already published
Wednesday, November 24, 2010
एकमेव 8 Mar 2010, 0055 hrs IST
विमानळावर येणाऱ्या विमानात इंधन भरण्याचं काम गेली दहा ते बारा वर्षं त्या करत आहेत. हेड ऑफिसमध्ये काम करताना प्रमोशनची संधी चालून आली ती हे वेगळं काम हाती घेऊनच. एक आव्हान म्हणून हे काम स्वीकारल्यानंतर खडतर ट्रेनिंग घेणं, इंधन भरताना त्याचा दर्जा कायम ठेवण्यासाठी क्वॉलिटी चेक करणं, डॉक्युमेण्टेशन यासारख्या अनेक गोष्टींचा सखोल अभ्यास करावा लागला. अनेक परीक्षा होऊन, डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एविएशन लायसन्स आणि क्वॉलिटी कण्ट्रोल सटिर्फिकेट त्यांनी मिळवलं. विमानतळावरील सर्व कामं पार पाडण्यासाठी गाडीही शिकल्या. या सर्व कष्टांचं फळ म्हणजे सलग नऊ वर्षं मुंबई आणि तीन वर्षं नाशिक विमानतळावर त्यांनी यशस्वीपणे आपलं काम पार पाडलं.
राष्ट्रपती, उपराष्ट्रपती अशा अनेक महत्त्वाच्या व्यक्तींच्या विमानांमध्ये रिफीलिंग त्यांनी केलं आहे. केवळ एक स्त्री आहे म्हणून त्यांनी कोणत्याही सवलतींची अपेक्षा न करता इतर पुरुष कर्मचाऱ्यांप्रमाणेच र्फस्ट, सेकण्ड आणि नाइट शिफ्टही केल्या. यासाठी कधी पहाटे चार वाजता घर सोडावं लागायचं, तर कधी अपरात्री घरी परतावं लागे. तरीही जिद्दीने त्यांनी ही जबाबदारी १४ वर्षांत पार पाडली. कुटुंबियांबरोबरच सहकाऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झाल्याचं त्या सांगतात.
'कोणत्याही क्षेत्रात काम करताना जिद्दीने आणि सचोटीने काम केल्यास यश नक्की मिळतं. एक स्त्री आहे म्हणून काम टाळण्याच्या सबबी न सांगता पुरुषांप्रमाणेच काम करण्यास मी सक्षम आहे, हा आत्मविश्वास ठेवूनच मी प्रत्येक आव्हानाला सामोरी गेले म्हणूनच हे यश मिळवू शकले,' त्या सांगतात.
- मीनाक्षी कुलकर्णी
टॅलेण्टेड 'प्रकल्प' 7 Apr 2010, 2251 hrs IST
'प्रकल्प' हा टेक्निकल फेस्टिवल
३ एप्रिल रोजी पार पडला. मुंबई तसंच महाराष्ट्रातील इतर कॉलेजांमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रोजेक्ट्सचं प्रदर्शन यावेळी मांडण्यात आलं होतं. वायरलेस ऑटोमॅटिक रेल्वे क्रॉसिंग गेट, स्पाय रोबोट, हायवे स्पीड सेन्सिंग, मल्टिपल फेस डिटेक्शन यासारखे अफलातून प्रोजेक्ट्स ठेवण्यात आले होते. मात्र, आकर्षणबिंदू ठरला तो यश मुळगावकरने तयार केलेला 'रोबोटिक आर्म'. मानेच्या हालचालीनुसार या हाताची हालचार ठरते. पाणी पिणं, खाणं, वस्तू (अर्ध्या किलो वजनापर्यंतच्या) उचलून दुसरीकडे ठेवणं अशी कामं हा रोबोटिक आर्म सहज करतो.
एका हाताने अपंग असणाऱ्या व्यक्तींसाठी अशा स्वरुपाचा हात नक्कीच उपयुक्त ठरू शकतो. या रोबोटिक आर्मचं वैशिष्ट्य म्हणजे हा धातूचा हात बसवण्यासाठी कोणत्याही महागड्या ऑपरेशनची गरज नाही. प्राथमिक स्थितीत असणारा या रोबोटिक आर्ममध्ये अधिक सुधारणा करून या वर्षअखेरीस तो बाजारात आणण्याचा हेतू असल्याचं यश सांगतो. सध्या प्रोजेक्ट म्हणून हा आर्म बनवण्यात आला असला, तरी त्याला व्यावसायिक स्वरुप देण्यात येईल. या आर्ममुळे अपंगांना खऱ्या अर्थाने मदतीचा हात मिळाला आहे, असं म्हणायला हरकत नाही.
सुपरफास्ट
रोबोटिक आर्मप्रमाणेच ओरियन रेसिंग कारनेही उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. फॉर्म्युला वनमधील गाड्यांसारखीच ही रेसिंग कार आहे. या गाडीमध्ये अधिकाधिक अचूकता आणण्यात आली असून गेल्या वषीर् जर्मनीमधील सोसायटी ऑफ ऑटोमोटिव इंजिनीअर्सतफेर् घेण्यात येणाऱ्या स्पधेर्मध्ये बक्षीसही मिळवलं होतं. या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे वळण घेताना गाडीचा वेग खूप कमी करावा लागत नाही.ं
मदतीचा रोबोहात
रोबोटिक आर्म भविष्यात अतिशय उपयोगी ठरेल. अपंगांसाठी हा आर्म खूप उपयुक्त ठरू शकतो. पेशण्ट्सवर याचा प्रयोग करून प्रत्यक्षात काय अडचणी येऊ शकतात, ते कळेल आणि त्यानुसार पुढील पावलं उचलली जातील असं कॉलेजचे प्रोफेसर मिलिंद मराठे यांनी सांगितलं.
-मीनाक्षी कुलकर्णी
गोष्ट चांगलीच, पण... 14 Apr 2010, 0022 hrs IST
विकेंदीकरणातून विकास
विद्यापीठाच्या शाखा उघडण्याचा निर्णय उपनगरांतल्या मुलांसाठी खूप चांगला आहे. अनेक विद्यार्थ्यांना लेक्चरसाठी विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये जावं लागतं. पावसाळ्यात तर हे खूपच त्रासदायक ठरतं. तसंच विद्यापीठात होणारे अनेक कोसेर्स अशा शाखांमुळे जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचतील. विद्यापीठाच्या विकासासाठीही हा निर्णय खूप चांगला आहे. विकेंदीकरण झालं, तर जास्त विकास होईल.
अदिती धुपकर, डोंबिवली
क्वालिटीचं काय?
विद्यापीठात सध्या अॅडमिनिस्ट्रेटिव्ह कामाचा कचरा झालाय. कालिनाच्या महात्मा फुले भवन म्हणजेच एक्झाम हाऊसमध्ये जो गोंधळ चालतो तो यामुळे काहीसा कमी होईल. पण असं विकेंदीकरण झालं, तर इतर ठिकाणच्या विद्यार्थ्यांना मुंबईत मिळणाऱ्या तोडीचंच शिक्षण मिळेल का, हा पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. माझ्या मते इतर ठिकाणच्या विद्यार्थ्यांना ती क्वालिटी नाही मिळणार.
रिंकेश धारोड, एमए पार्ट टू हिस्ट्री
गोंधळात भरच
काय फायदा होणार आहे विद्यापीठाच्या शाखा वाढवून? काहीच नाही. उलट आत्ता जो गोंधळ सुरू आहे, तो दुप्पट तिप्पट वाढेलच. सध्या दोन कॅम्पस असताना लेक्चरचा सगळा भार तसाही कलिना कॅम्पसवरच पडतो. फोर्ट कॅम्पसला विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फार काही होतच नाही. त्यातून विद्यापीठाच्या अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये जो सावळागोंधळ सुरू आहे, त्याचं काय?
मयुरेश कापसे, एमए पार्ट वन
पॉलिटिकल सायन्स
उपनगरातल्या मुलांना फायदा
माझ्या मते हा निर्णय खूप चांगला आहे. कल्याण, भाईंदर किंवा दहिसर, पनवेल अशा ठिकाणी विद्यापीठाच्या शाखा उघडल्यास अनेक विद्यार्थ्यांना खूप बरं पडेल. या व्यतिरिक्त आणखी काय फरक पडेल हे आत्ता सांगणं कठीण आहे. पण, विद्यापीठात चालणारे कोसेर्स इतर शाखांमध्येही चालायला हवेत. बाकी काही फायदा होईल, असं आत्ता तरी सांगण कठीण आहे. तरच त्याचा खरा फायदा विद्यार्थ्यांना मिळेल.
श्रीकला भागवत, एमए मराठी
प्रॉब्लेमच्या मुळाशी जायला हवं
मुंबई विद्यापीठाच्या कारभारात गोंधळ कशामुळे झाला याची चौकशी व्हावी. यापूवीर् जेव्हा विद्यापीठ लोकप्रियतेच्या शिखरावर होतं तेव्हा विकेंदीकरणाची गरज वाटली नव्हती. मुद्दा हा, की तिथल्या कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉश केलं पाहिजे. कॅम्पस वाढवणं चांगलं आहेच. पण, प्रॉब्लेमच्या मुळाशी जाऊन शोध घेतला पाहिजे. नाहीतर, कलिनापुरता मर्यादित असलेला विद्यापीठाचा गोंधळ उपनगरातही पसरेल. त्यानंतर मात्र मागे फिरण्याचा ऑप्शन बंद झाला असेल.
अनिकेत माने, एमए समाजशास्त्र
भ्रष्टाचाराचं नवं कुरण
विद्यापीठाचं विभाजन होतंय हे प्रशासकीय कामकाजासाठी चांगलं आहे. कारण विद्यापीठाचा आवाका मोठा आहे. कार्यपद्घती सुरळीत होण्यासाठी अशा विभाजनाची गरज आहे. त्यानिमित्ताने गोंधळ तरी कमी होईल. पण भ्रष्टाचाराला नवीन जागा मिळणार हे नक्की.
पियुष झा, एमबीए स्टुडण्ट
दजेर्दार अभ्यासक्रम हवा
विद्यापीठाचं विभाजन झालं, तरी शिक्षणाचा दर्जा सुधारणार आहे का? नवी विद्यापीठांबरोबरच चांगल्या सुविधा आणि दजेर्दार अभ्यासक्रमांसाठी प्रयत्न होऊन तशा स्वरुपाचा प्रस्ताव आल्यास बरं होईल.
अन्वया खडेर्, मास्टर इन जर्नालिझम र्फस्ट इयर
चांगला निर्णय
विभाजनाचा निर्णय चांगला आहे. मुंबई विद्यापीठाला विभाजनाची खरोखर गरज आहे. यामुळे गुंतवणूक, कार्यक्षमता तसंच शिक्षणाच्या दर्जामध्ये नक्कीच सुधारणा होईल.
धनश्री पाताडे, मास्टर इन जर्नालिझम
सेकण्ड इयर
संवाद चांगला हवा
विभाजनामुळे कार्यपद्घतीत सुधारणा आली, तरी नव्या कॅम्पसला नाव नसेल. त्यामुळे परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण होऊ शकते. नव्याने निर्माण होणाऱ्या कॅम्पसचं आणि मूळ मुंबई विद्यापीठांचं कम्युनिकेशनही उत्तम असायला हवं. नाहीतर, मुलांचे हाल होतील, हे नक्की.
राजेश महाजनी, एमए इकानॉमिक्स
वेळेची बचत
आम्ही रुपारेल कॉलेजमधून एमएससी करत असलो, तरी थिअरीसाठी सर्व कॉलेजचे विद्याथीर् कलिनालाच एकत्र जमतात. म्हणजे प्रॅक्टिकल एकिकडे आणि थिअरी दुसरीकडे असते. अशा वेळेस जाण्या-येण्यातच खूप वेळ जातो. मग अभ्यास तरी कधी करणार? पण जर ठाण्यासारख्या मध्यवतीर् ठिकाणी कॅम्पस झालं तर प्रॅक्टिकल आणि थिअरी एकत्र करता येईल. त्यामुळे उपनगरात राहणाऱ्यांचा बराच वेळ वाचेल, तोच वेळ अभ्यासासाठी वापरता येईल.
रेणुका फणसळकर, एमएससी, रुपारेल कॉलेज
हजेरी वाढण्यास मदत
कल्याण , डांेबिवलीला विद्यापीठाची सब सेण्टर्स असली, तरी तिथे फक्त अॅडमिशन होऊ शकते. पण स्टडी मटेरियल, हॉल-तिकीट अशा अनेक गोष्टींसाठी वा लेक्चरसाठी कल्याण, बदलापूर किंवा त्यापुढे राहणाऱ्यांना खूप लांब यावं लागतं. कॅम्पसचं विकेंदीकरण झालं तर खूप वेळ वाचेल. त्यामुळे हजेरी वाढेल. नोकरी करणाऱ्यांना किंवा काही अडचणी उद्भवल्या तर या कॅम्पसचा उपयोग होऊ शकतो.
मिनल निजसुरे, एम.कॉम, करस्पॉडन्स,
व्यवस्थापनावरचा ताण कमी होईल
हे विभाजन झालं तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरचा ताण कमी होईल. तसंच जवळच्या अथवा मध्यवतीर् ठिकाणी विद्यापीठ असल्याने नोकरी करणारे आणि तिथे राहणारी मुलं लेक्चरला रेग्युलरली जाऊ शकतील. याचा फायदा पावसाळ्यात जास्त होईल.
श्रेयस राऊत, एमएससी.
मुलांची संख्या वाढेल
विद्यापीठाचा स्टाफ मोठा आहे. को-ऑॅपरेटिव्हही आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांना कॉलेज अटेण्ड करायचं असतं. पण प्रवास मोठा असल्याने अनेक अडचणी असतात. विद्यापीठाच्या शाखा वाढल्या तर मुलांची संख्या वाढेल.
अपूर्वा कुलकणीर्, पोस्ट ग्रॅज्युएशन, ट्रॅव्हल-टुरिझम.
.
हॉस्टेलचा खर्च वाचेल
पोस्ट-ग्रॅज्युएशन लेव्हलला एक-दोन लेक्चर्स असतात, त्या एक-दीड तासाच्या लेक्चरसाठी रोज तीन-साडेतीन तास प्रवास करण्यात घालवावे लागतात आणि संेट्रलच्या लोकांना पावसाळ्यात ट्रेन्समुळे खूपच त्रास होतो. कित्येक मुलं तर प्रवास वाचवण्यासाठी हॉस्टेलमध्येही राहतात, त्यांचाही खर्च कमी होईल.
निलेश आवारी, एमएससी.
संवाद वाढेल
एकाच वेळी अनेक कोसेर्स सुरु असल्याने लाखांेच्या संख्येने विद्याथीर् युनिव्हसिर्टीत शिकतात. आणि त्यामुळेच तिथल्या कर्मचाऱ्यांवर मोठा ताण येतो. पर्यायाने विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होतं. या विभाजनामुळे शिक्षक व कर्मचारी आणि मुलं यांच्यात संवाद वाढेल.
पवन यादव, एमएससी, करस्पॉडन्स
कार्यक्षमता वाढेल
मुंबई विद्यापीठाचा पसारा मोठा आहे. कार्यक्षेत्रं लांबवर पसरल्यामुळे विद्यार्थ्यांना लहान-सहान कामांसाठी कलिना कॅम्पसपर्यंत यावं लागतं. विद्यापीठाची केंद सुरु झाली, तर विद्यार्थ्यांचे कष्ट आणि वेळ वाचेल. त्याचप्रमाणे सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरचा कामाचा ताण हलका होईल. त्यामुळे कदाचित त्यांची कार्यक्षमतासुद्घा वाढेल.
अमरीश पवार, एमएससी फिजिक्स,
भवन्स कॉलेज
केंदं नेटकी असावीत
विभाजनापेक्षा केंद सुरु करून ती नीट आणि पद्धतशीरपणे चालवावीत. अनेक कॅम्पस सुरु केल्याने नुकसान अधिक होईल. एखादी बँक नवी शाखा काढते तेव्हा ती आपलं नाव बदलत नाही. त्याप्रमाणे विद्यापीठाने केंदं सुरु करावित. शिवाय, या नव्या केंदाना स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जाही नसावा.
स्नेहा सराफ, एमएससी, लाइफ सायन्स
कॉलेजियन्सचा दिवाळी कट्टा 28 Oct 2010, 1233 hrs IST
' चला, दिवाळी जवळ आली. कामाला लागा...' अशी हाक आईने दिल्यामुळे तमाम कॉलेजियन्स सध्या घरात दिवाळीची तयारी करण्यात गुंतलेले आहेत. परीक्षा संपल्यामुळे 'रिकामटेकडे' झालेले हे कॉलेजियन्स घरातल्या खोल्यांमध्ये मुक्त संचार करताहेत. एरव्ही सुट्टीतही कट्ट्यांवर दिसणारी ही मंडळी सध्या घराची साफसफाई, रंगरंगोटी, फराळाची तयारी करण्यात बिझी आहेत. त्यामुळे सगळे कट्टेही ओस पडलेले दिसताहेत.
सकाळी उठून घरातली साफसफाई त्यानंतर दुपारी फराळाला मदत आणि संध्याकाळी 'अत्यावश्यक' वस्तूंची खरेदी असा कॉलेजियन्सचा सध्याचा दिनक्रम आहे. अगदी स्वत:चा खण आवरण्यापासून ते घरातल्या माळ्यावर चढून साफसफाई करेपर्यंत या मंडळींनी मजल मारली आहे. काहींसाठी ही कामं त्यांच्यावर घरच्यांनी लादलेली आहेत, तर काहीजणांना त्यात मजा येतेय. आरकेटी कॉलेजमध्ये एसवायबीएस्सी करणाऱ्या विरेंद महाजन आणि त्याच्या मित्रांनी प्रत्येकाच्या घरात आळीपाळीने रंग लावण्याचं ठरवलंय. तर मॉडेल कॉलेजचा सुशील पाटील घराचं रंगकाम करण्यात वडिलांना मदत करतोय.
घरात उत्साहाने अशी कामं करायला तयार होण्यामागे (किमान तसा उत्साह दाखवण्यामागे) या मंडळींची खास कारणंही आहेत. खरेदीचं अर्थकारण यामागे असल्याचं कॉलेजियन्स आवर्जून सांगतात. काम पूर्ण केल्यावर खरेदीच्या वेळी आपल्या मनाजोगी खरेदी करता येते. अगदी कपड्यांपासून बाईकपर्यंत आणि मोबाइलपासून लॅपटॉपपर्यंतच्या मागण्या पूर्ण करून घेता येतात, असं अनेक विद्यार्थ्यांना वाटतं. घरातल्या घरात एक प्रकारची एक्सचेंज ऑफरच असते ही.
एकीकडे झाडलोट, रंगरंगोटी करण्यात मुलं बिझी असतानाच कॉलेजमधल्या तमाम मुली सध्या किचनमध्ये आईला फराळ करण्यात गुंतलेल्या आहेत. कढईमध्ये पीठं भाजण्याचे दिवस सुरू झाले आहेत. सुट्टी लागल्यामुळे घरातल्या कामांमध्ये मदत करणं सुरू झालंय. मला मुळातच घरकामाची आवड असल्याने पूर्ण घराची साफ-सफाई करणं, फराळ बनवण्यात हातभार लावणं ही कामं मी आवडीने करते, असं पंेढारकर कॉलेजमध्ये टीवायबीकॉमला शिकणारी मधुरा कुलकणीर् सांगते. स्वखुशीने अशा कामांमध्ये झोकून देणाऱ्या मुलींची संख्या तशी फारशी नसली तरी पर्याय नसल्यामुळे त्यात आनंद मानायला लागतोय. रांगोळ्यांचा बॉक्स शोधून काढणं, नवीन डिझाइन्स बघणं, पणत्या रंगवणं अशा कामांचा 'अभ्यास' आता सुरू झालाय.
घरातल्या तयारीबरोबरच काही जण चक्क आई-वडिलांबरोबर खरेदीला जायला लागले आहेत. ही खरेदी स्वत:साठी नसून घरच्या जिन्नसांची आणि परमपूज्यांच्या कपड्यांची आहे. त्यामुळे 'मी संध्याकाळी ७ वाजता स्टेशनवर भेटेन. तयार रहा. आज ड्रेस मटेरियल घेऊनच टाकू,' असे संवाद वडीलधारे आणि आपले कॉलेजियन्स यांच्यात घडत आहेत. कटिंग पीत कट्ट्यावर गप्पा हाणण्याच्या संध्याकाळच्या वेळी ही मुलंमुली हातात दोन-दोन पिशव्या घेऊन खरेदीला जाताना दिसताहेत. फक्त कपड्यांपुरतीच मर्यादित असणारी त्यांची शॉपिंग दिवाळीच्या निमित्ताने पडदे, चादरी, उशांचे अभ्रे इतकंच काय पण, कपबशा, भांड्याकुंड्यापर्यंत जाऊन पोहोचलीय.
- श्रीकांत सावंत,
मीनाक्षी कुलकर्णी
( कॉलेज क्लब रिपोर्टर)
वादच नाय 25 Nov 2010, 0014 hrs IST
कट्ट्यावर बोलबच्चन देणारे, मस्का मारून समोरच्याला पटवणारे असे सगळेच जण कॉलेज फेस्टिव्हलमध्ये आपले हिडन टॅलेण्ट्स वापरत असतात. मल्हार, उमंग, मूड-आयस ' यार, यंदाचा मल्हार काय मस्त होता ना' किंवा 'छ्यॅ, या वेळी त्या फेस्टला इतकी मजा नाही आली,' असे अनेक प्रकारचे शेरे प्रत्येक कॉलेज फेस्टिव्हलनंतर ऐकायला मिळतात. पण, एखादा फेस्टिव्हल आयोजित करण्यासाठी त्या-त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी खूप परिश्रम घेतलेले असतात, याचा या शेरेबाजांना अनेकदा विसर पडतो. कॉलेज कोणतंही असो; फेस्टिव्हल हा त्या कॉलेजचा मानबिंदू समजला जातो. तो चांगला व्हावा, यासाठी कॉलेजचे काही विद्याथीर् महिनो न् महिने तयारी करत असतात. कॉलेज फेस्टिव्हलची तयारी सुरू होते, ती वेगवेगळी कामं करणाऱ्या ग्रुपच्या निवडीतून! यात इन्फ्रास्ट्रक्चर, सिक्युरिटी, हॉस्पिटॅलिटी, माकेर्टिंग, मीडिया अशा अनेक टीम्सचा सहभाग असतो. त्या टीमची कामं, त्यांच्या को-ऑडिर्नेटर्सचा अनुभव आणि त्या अनुभवातून त्यांना मिळालेलं शहाणपण याची बाकीच्यांना कल्पनाही नसते. ते शहाणपण आणि तो अनुभव विविध कॉलेजांमधील काही को-ऑडिर्नेटर्सच्याच शब्दांत... आमच्या टीमचं काम गेल्या चार-पाच वर्षांत खूपच वाढलंय. पब्लिसिटी टीम आणि आम्ही हातात हात घालून कामं करतो. कॉलेजच्या फेस्टिव्हलला आणि पर्यायाने कॉलेजला प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्धी मिळवून देणं, हे आमच्या टीमचं मुख्य काम असतं. त्यासाठी मीडियाच्या अभ्यासाची खूपच गरज असते. फेस्टिव्हलची थीम मीडियाद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं, तसंच एखाद्या पेपरसोबत किंवा न्यूज किंवा रेडिओ चॅनलसोबत टायअप करणं यात आमचा महत्त्वाचा वाटा असतो. इव्हेण्टला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी आमची टीम सतत झटत असते. त्यामुळे मीडियात वावरणाऱ्या माणसांशी कसं बोलावं, वागावं, याचं उत्तम ज्ञान मिळतं. भविष्यात एखाद्याला त्या क्षेत्रात करिअर करायचं असेल, तर त्याच्या ओळखीही होतात. रिद्धी गोळवणकर, भवन्स अॅन्युअल फेस्टिव्हलसाठी कॉलेजकडून मोठं बजेट मिळणं कठीण असतं. अशा वेळी फेस्टिव्हल झोकात पार पाडण्यासाठी प्रायोजक मिळवावे लागतात. यासाठी फेस्टिव्हलआधी आठ-नऊ महिने आधीपासून आम्ही मेहनत करत असतो. प्रायोजक शोधणं, त्यांच्यासमोर फेस्टिव्हलची थीम सादर करणं आणि मग, त्यांच्याकडून स्पॉन्सरशिप मिळवणं हे सगळं आम्ही बघतो. स्पॉन्सर्स आणि कॉलेज या दोघांच्या दृष्टीने ते फायद्याचं असतं. दुसरा फायदा म्हणजे अनेक कंपन्या कॅम्पसवर येतात. त्या आपले काही इव्हेण्ट्सही ठेवतात. त्याचाही फायदा क्राऊडला होतो. व्यक्तिश: म्हणाल, तर माझी कम्युनिकेशन स्किल्स वाढायला माझ्या को-ऑडिर्नेटरशिपची खूपच मदत झाली. २४ जण मिळून एक ग्रुप म्हणून काम करणं हेसुद्धा खूप शिकवून जातं. तुमच्यात टीम स्पिरिट वाढतं. स्पॉन्सरर्ससमोर प्रेझेण्टेशन केल्याने सादरीकरणाचं कौशल्यही वाढतं. अभिषेक कोरी, साठ्ये एखाद्या फेस्टिव्हलची थीम ठरल्यानंतर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं, हे आमचं काम असतं. त्यासाठी आम्ही फेस्टिव्हलच्या सात-आठ महिने आधी कामाला लागतो. त्या थीमशी निगडीत पोस्टर्स, ब्रोशर्स, पॅम्प्लेट्स बनवून घेणं, ती योग्य ठिकाणी पोहोचवणं आदी सगळी काम करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस झटतो. आता तर सोशल नेटवकिर्ंग साइटवर फेस्टिव्हलचं पेज वगैरे तयार केलं, तरी खूप पब्लिसिटी होते. फेस्टिव्हलची पब्लिसिटी करण्यासाठी त्याच्याशी निगडीत इव्हेण्ट्स ऑर्गनाइझ करण्यातही अनेकदा आमचा हातभार असतो. फेस्टिव्हल होतो, हे अनेक कॉलेजांमध्ये माहिती असतं पण, त्यात नवीन काय हे सांगण्याचं काम पब्लिसिटी टीम करते. तसंच नवनवीन कॉलेजांनी फेस्टिव्हलमध्ये भाग घ्यावा, याकडेही ही टीम लक्ष ठेवून असते. पब्लिसिटी टीममध्ये काम करून टीमवर्कचा चांगला धडा मला मिळाला. काहीतरी शिकणं, हे तर होतंच असतं. पण, त्याहीपेक्षा जास्त म्हणजे एकत्र येऊन मजा कधीच विसरणं शक्य नाही. रोहित श्रॉफ, आयआयटी गेली दोन वर्षं मी हॉस्पिटॅलिटीचं काम सांभाळतेय. संपूर्ण फेस्टिव्हलमध्ये येणाऱ्या परीक्षकांचं, सेलिब्रिटींचं आदरातिथ्य करणं, त्यांच्या आणि सगळ्या व्हॉलेंटिअर्सच्या खाण्यापिण्याची जबाबदारी हॉस्पिटॅलिटी टीमवर असते. इव्हेण्टच्या ठिकाणी पाण्याच्या बाटलीपासून स्नॅक्सपर्यंत सगळ्या खाण्यापिण्याच्या गोष्टी व्यवस्थित गेल्या की नाही, ही जबाबदारी आमची असते. त्याशिवाय बॅकस्टेज आटिर्स्टची सगळी व्यवस्था बघावी लागते. फेस्टिव्हलसाठी हॉस्पिटॅलिटी टीममध्ये काम करून टाइम मॅनेजमेण्ट जमू लागलं. तसंच तुमच्या कामात एवढीही चूक चालणार नसल्याने आपोआप 'पफेर्क्शन' येत गेलं. या टीममध्ये काम केल्यानं तुम्ही उत्तम 'होस्ट' बनू शकता. त्यामुळे भविष्यात कोणतंही काम करताना दडपण निश्चितच जाणावणार नाही. पृथा दावडा, सोमय्या कॉलेज ' मल्हार'सारख्या मोठ्या फेस्टिव्हलसाठी हॉस्पिटॅलिटीचं काम सांभाळणं खूपच आव्हानात्मक असतं. मुंबईबाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची सोय बघणं, त्यांना रिसिव्ह करणं, हॉटेल बुक करणं, आवश्यक ती मदत पुरवणं अशी अनेक कामं आम्हाला करावी लागतात. त्याशिवाय कॉलेजमधल्या व्हॉलेंटिअर्सची सोय करणं, कॅटरर्स ठरवणं वगैरेही कामं आमचीच असतात. ही सगळी काम करताना माझा झालेला फायदा म्हणजे माझा संयम खूप वाढला. तसंच अनेक समस्या हाताळायला शिकले. हेन्ना खेमानी, सेण्ट झेविअर्स कॉलेज आमचं काम सुरू होतं, ते फेस्टिव्हलच्या दिवशी! कॉलेजमध्ये फेस्टिव्हलदरम्यान पूर्ण सुरक्षा ठेवणं हे या टीमचं काम. त्यासाठी आमच्याकडे व्हॉलेंटिअर्सची खंदी टीम तयार असते. आत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी करून मगच त्यांना सोडलं जातं. फेस्टिव्हलदरम्यान डीओडरण्ट, टोकदार वस्तू, पावडर, बाटल्या अशा गोष्टी कॅम्पसमध्ये जाणार नाहीत, याची काळजी आम्ही घेतो. त्यासाठी बूटांपासून कमरेच्या पट्ट्यापर्यंत सगळ्या गोष्टी तपासण्याचं काम आमच्या हाती असतं. अनेक कॉलेजांमध्ये तर सिक्युरिटी टीमला फायर फायटिंग ट्रेनिंगही दिलं जातं. सिक्युरिटी टीम ही फेस्टिव्हलसाठी महत्त्वाची असते खासच! संपूर्ण इव्हेण्ट सुरळीत पार पडण्याची जबाबदारी आमच्यावर असते. आम्हाला फेस्टिव्हलची मजाही धड लुटता येत नाही पण, त्याबाबत आमची तक्रार नाही. कारण आपल्यामुळे इतर विद्याथीर् एन्जॉय करतात, याचंच समाधान मोठं असतं. झटपट निर्णय घेणं हे याचमुळे आम्हाला शिकायला मिळतं, ते वेगळंच! राजीव अभंग, रुईया कॉलेज संकलन : मधुरा आपटे, मीनाक्षी कुलकर्णी कॉलेज क्लब रिपोर्टर | |
आवाज दो... कहाँ है? 25 Nov 2010, 0014 hrs IST
नोव्हेंबर महिना संपत आला तरी कॉलेजेसमध्ये जीएस नसल्याने स्टुडण्ट्सना त्याची उणीव भासतेय. फेस्टिव्हल्स तोंडावर असताना ' मुंबई जीएस हवाच मुळात दरवषीर् जीएसची निवड ही कॉलेजांमध्ये गणेशोत्सवाच्या आधी होत असते. गेल्या वषीर्ही असा प्रॉब्लेम झाला होता पण त्याची फारशी चर्चा झाली नाही. यंदाही एकूण परिस्थिती पाहता जीएसच्या निवडीला डिसेंबरअखेर किंवा जानेवारीच उजाडेल असं वाटतं. खरं तर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कॉलेजेसमध्ये अनेक इव्हेण्ट्स, फेस्टिव्हल्स होत असतात. त्यामुळे तेव्हा जीएस असणं आवश्यक असतं. स्टुडण्ट्सचं म्हणणं पोहोचवणं हे जीएसचं प्रमुख काम. जीएसची निवड कॉलेज सुरू होतात तेव्हा म्हणजे जुलै महिन्यातच होऊ शकली तर अनेक अॅक्टिव्हिटींच्या दृष्टीने त्यांचा उपयोग होतो. पण तरीही जीएस असणं हे मात्र आवश्यक आहेच. युनिव्हसिर्टीने जुलै-ऑगस्ट महिन्यातच ही प्रोसेस पूर्ण करून जीएसची निवड करून घेतली पाहिजे. कारण जीएस हा विद्यार्थ्यांचा आवाज आहे हे नक्की आणि तो कोणत्याही परिस्थितीत दाबला जायला नको. आदित्य शिरोडकर अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना ........................................................... इंजिनीअरिंग अॅडमिशन्समुळे उशीर गेली अनेक वर्षं जीएसची निवडणूक प्रक्रिया सर्वसमावेशक व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. यंदा इंजिनीअरिंगच्या प्रवेशप्रक्रियेला खूप उशीर झाला. इतर कॉलेजांप्रमाणे इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनाही प्रोसेसमध्ये आणणं गरजेचं होतं. यामुळेच यावषीर् जीएसची निवडणूक लांबली. यात कोणत्याही प्रकारचं राजकारण असण्याचा प्रश्नच नाही. जीएसचा रोल फक्त फेस्टिव्हल्सपुरता मर्यादीत असतो हा दृष्टीकोन न ठेवता तो एकूणच एज्युकेशनल मूव्हमेण्टचा भाग असतो असं आम्हाला वाटतं. पण युनिव्हसिर्टी अॅक्टप्रमाणे कोणत्याही राजकीय गोष्टी निवडणुकांमध्ये आणायला उमेदवारांना परवानगी दिली जातं नाही. त्यामुळे फक्त इंजिनीअरिंगच्या अॅडमिशन प्रक्रियेमुळे हा उशीर झालाय. निवडणुकांचं र्सक्युलर एकदाच निघतं. एका वर्षात दोनदा निवडणुका घेणं शक्यही होतं नाही. मृदूल निळे डायरेक्टर (डिपार्टमेण्ट ऑफ स्टुडण्ट वेल्फेअर) ........................................................... राजकारण्यांचं शक्तीप्रदर्शन जीएस म्हणजे विद्यार्थ्यांचा आधारस्तंभ. परंतु जीएसच्या निवडणुकीमागे मुंबई युनिव्हसिर्टीचा काही डाव असेल असं मात्र वाटत नाही. युनिव्हसिर्टीला आधीच इतके व्याप आहेत की कदाचित त्यातून ही निवडणूक राहून गेली असेल. जीएस नसल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अडचणी मांडता येत नाहीत हे मात्र खरं. फेस्टिव्हलच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांचं आयोजन ज्यांना करायचं आहे ते करणारच. प्रत्येकाला वाटतं की आपण फेस्टिव्हल हेड असावं पण ते शक्य होऊ शकत नाही. त्यामुळे हे असे राडे होत असतात. अशा राड्यांमागे राजकारण्यांचं शक्तीप्रदर्शनच होत असतं. जीएस असल्यामुळे त्याला थोड्याफार प्रमाणात आळा बसतो हे मात्र खरं. विद्यार्थ्यांना याचा काही फरक पडत नाही. कारण त्यांना हे राडे पचवण्याची सवय झाली आहे. फेस्टिव्हलमध्ये असे राडे केल्यानेच रंगत येते. ती येण्यासाठीच असे प्रकार घडवावे लागतात. पण म्हणूनच जीएस असल्या-नसल्याने फारसा फरक पडत नाही. मीनाक्षी पवार मुंबई युनिव्हर्सिटी ........................................................... भार कल्चरल लीडर्सवर आतापर्यंत दिवाळीची सुट्टी असल्याने काही प्रॉब्लेम नव्हता. पण आता कॉलेजेस सुरू होतील आणि अजूनही जीएसचा पत्ता नाही. अवघ्या महिनाभराच्या अंतरावर आलेल्या कॉलेज फेस्टिव्हल्सच्या तयारीबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे. जीएस नसल्यामुळे आमच्या कॉलेजच्या सगळ्या कल्चरल अॅक्टिव्हिटीजचा भार दोन कल्चरल लीडर्सवर पडतोय. कॉलेजबाबत स्टुडण्ट्सना जाणवणारे सगळे प्रॉब्लेम तसेच रेंगाळत पडले आहेत. आदित्य काळे एफवायबीकॉम, सीएचएम कॉलेज ........................................................... फेस्टिव्हल्सचं प्लॅनिंग रखडलं जीएसच्या नेमणुकीला होणाऱ्या उशिरामुळे फेस्टिव्हल्सचं प्लॅनिंग बोंबलतंय. जबाबदारी कुणी घ्यायची हेच ठरलेलं नसल्याने वेळ फुकट चालला आहे. कॉलेजची लेक्चर्स वेळेवर न होण्यामुळे अभ्यासावर आणि प्रोजेक्ट्सवर त्याचा परिणाम झाला आहे. या साऱ्याबाबत बोलणारं मात्र कुणीच नाही. सुशील अहिरे टीवायबीएमएम, एस.के.सोमय्या कॉलेज ........................................................... माहिती मिळत नाहीय आधी फेस्टिव्हल्स महिनाभर तरी चालायचे. पण आता ते चार-पाच दिवसांतच उरकले जातात. फेस्टिव्हल्सची माहिती विद्यार्थ्यांना नीट मिळत नाही. एकांकिका वगैरे कधी होतात ते कळत नाही. जीएसच नसल्यामुळे आमच्यापर्यंत ही माहिती अधिकृतपणे पोहोचत नाही. मधुरा कुलकर्णी टीवायबीकॉम, पेंढारकर कॉलेज ........................................................... नेतृत्वाचा प्लॅटफॉर्म कॉलेज प्रशासन आणि विद्यार्थी यांच्यातला प्रभावी दुवा म्हणजे निवडून आलेला प्रतिनिधी. विद्याथीर् आणि कॉलेज प्रशासन यांच्यात विचारांचं आदानप्रदान प्रभावी होण्यासाठी विद्यार्थी संघटनांचं अस्तित्व महत्त्वाचं असतं. या शैक्षणिक वर्षात जीएसच्या निवडणुका लांबणीवर टाकून विद्यार्थ्यांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न केल्याच्या मुद्द्यात तसं काही तथ्य वाटत नाही. जीएस निवडणुकांना राजकिय किनार लाभल्याने त्या पारदर्शकतेपासून मात्र दूर गेल्या आहेत असं विद्यार्थ्यांना वाटतंय. या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांमधली धनदांडग्यांची मुलं पैशांच्या जोरावर निवडून येतात. त्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या प्रश्नांशी फारसं देणंघेणं नसतं. सर्वच राजकीय पक्ष तरुणांना डोळ्यांसमोर ठेवून पडद्यामागून कॉलेज निवडणुकांमध्ये प्रवेश करून आपल्या पोळ्या भाजून घेतात. हे कुठेतरी थांबायला हवं. जीएसच्या निवडणुकांमधून विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्यासाठी व्यासपीठ मिळतं हे मात्र नक्की. अंकुर मयेकर ........................................................... प्रश्न कुणासमोर मांडायचे? जीएस नसल्याचा मुख्य तोटा फेस्टिव्हल्सना होणार आहे. अद्याप फेस्टिव्हल्सची तयारी बिलकूल होऊ शकलेली नाही. विद्यार्थ्यांमध्ये अंतर्गत राजकारण वाढलेलं असून त्याचा परिणाम उत्साही विद्यार्थ्यांच्या कामावर होतोय. लिफ्ट सुरू नसणं, क्लासरुम कॅण्टिनपासून दूर असणं असे अनेक प्रॉब्लेम्स विद्यार्थ्यांना जाणवत असतात. ते योग्य त्या फोरमवर जीएसच मांडू शकतो असं मला वाटतं. पण जीएसची नेमणूकच अद्यापि न झाल्याने हे प्रश्न कुणासमोर मांडायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. पल्लवी आपटे संकलन : मीनाक्षी कुलकर्णी कॉलेज क्लब रिपोर्टर | |
Sunday, September 13, 2009
Beauty & the beast
just bcoz of some once neglegence more than 20,000 people lost their lives in a night just like that. and so many people got injured , some are facing till now. and the main perso behind the owner of this Union Carboid company Waren Anderson is living his own retired life.
who gave him the right to kill so many people. why he and his company dint take such small precautions. why the companie's workers were not aware about such situations?
Are these pople's lifes so cheap that they can die just like that ??????
This article also mentions about 9/11 blasts in Twin towers..... "United States Of America" the most powerful country with new technologies.. but this great country also collapsed after this incident. Some people must have felt really happy because America's nose was down then in front of this horrifying terror...!!
But if we look as a human we all are facing same problems... we the peace lovers..... wont harm anyone until they do.......
so is that senscible that thousands of innocent people were killed by them....
we cant explain terror in bhopal that was also man maade mistake then why do we look at america by piitty...
whtaever happened was worst , we do agree.
and so its our responsibility as a human being to be careful, and we should fight back to these problem which happened in Bhopal or terror attacks in America in 2001 or attacks in Mumbai last year which shattered our lifes.....
I personally think we can fight back but it needs regular and concrete effforts....
Thursday, August 20, 2009
Yesterday i saw one of the most best movies. Atleast personally i think so its a best movie. Goshta Choti Dongaraewdhi..... its not just a movie but leads every one to think deeper, towards what we are going to? its a story about farmer's suiside, the main source of our living. bcoz of whom we eat n live. our government is announcing 1 lakh to the family members of dead farmers, but cant they provide hardly 20,000 for their living?
They have to go from so many hurdels. they dont have any idea whether rain will be good seeds quality is proper or not? then also by investing more than 50,ooo in seeds machines n all they are playing most risky gamble of their life. we and our goverment have to think over it.
we have the slogan of JAI Jawan Jai Kissan but in true its useless. Think over it guys. we are the future. so we have to take initiative.......
Thursday, July 30, 2009
Friendship
To me friendship is more like a journy u meet so many ppl some of them may leave you early some will be there till end . No matter how much time you spend with each other they leave some mark in your life. It might be good or bad but you get to learn lot of things & thats the way life leads.

