Saturday, June 28, 2014
Happy B'day पंचमदा
'वेक अप सिड'मध्ये एक वाक्य आहे आएशाच्या (नायिका- कोंकोणा सेन शर्मा) तोंडी.. मुझे पुराने हिंदी गाने अच्छे लगते है.. क्यूंकी वो आसानीसे याद तो रहते है...
तिला आवडू लागलेल्या मॅच्युअर बॉसबरोबर जॅझ ऐकायला गेलेली आयेशा.. दोन-तीन वेळा जाऊनही तिला त्यात इंटरेस्ट येत नाही, तेव्हा तो तिला विचारतो, तुला कोणत्या प्रकारच संगीत आवडतं , तेव्हा ती हे उत्तर देते आणि तिचा बॉस तिला 'बालिश' म्हणून हसतो. त्या वेळेस तिला जेवढं वाईट वाटलं त्याहून दसपट मला वाटलं. नायिकेला तो काही बोलला याचा राग नव्हता, पण गाण्यांबद्दल बोलला याच.. गाण, संगीत हे संगीत असतं, प्रत्येकाला ते का आवडावं हे व्यक्तीसापेक्ष आहे, त्यावरून चिडवण्याची गरज काय? असं वाटल होतं मला.
खरं तर मला गाण्यातलं फारसं काही कळतं नाही. पण तरीही गाणी ऐकण हे माझा आवडता विरंगुळा आहे. 'अत्यंत आवडती गाणी ऐकणे' हे माणसासाठी अतिशय soothing असतं. तुमच्या दुखावलेल्या मूडला, मनाला किंवा माणसांनाही खुश करण्यासाठी आवडती गाणी लावणं हा सर्वोत्तम उपाय आहे, असं मला वाटतं.
गाणं कोणतही असो, 'मोहित चौहानचं तुमसे ही' किंवा 'उदित नारायणंच पहला नशा', 'आशा भोसलेंचं एखादं गाणं' किंवा 'किशोर कुमार यांचं गाणं'.. बघायला गेलं तर यांच्यात काहीही साम्य नाही, म्हटलं तर आहे. सर्वजण उत्तम संगीताच्या धाग्याने एकमेकांशी बांधले गेलेले.
एखाद्या अप्रिय घटनेमुळे, किंवा एखाद्याच्या कृतीमुळे, बोलण्यामुळे आपण जेव्हा दुखावले जातो, vulnerable झालेले असतो, विचारांच्या गर्तेत अडकलेले असतो आणि प्रयत्न करूनही त्यातून जेव्हा बाहेर पडू शकत नाही, तेव्हा सरळ गाणी ऐकावीत.. गाण्याचे शब्द, ते संगीत, बीट्स हळूहळू तुम्हाला एका वेगळ्या दुनियेत नेतात, जिथे आनंदाशिवाय काहीही नसतं. तुम्ही आणि फक्त सुमधुर संगीत.
मी तरी असचं करते. 'कालही असाच एक प्रसंग घडला. कित्येक दिवसांपासून एक गोष्ट पूर्ण व्हायची, मार्गी लागायची आतुरतेने वाट पहात होते, पण मनासारखं काहीच न होत, परिस्थिती अजून चिघळत गेली. त्यामुळे मूड प्रचंड खराब. दिवस तशाच मन:स्थितीत गेलेला. ऑफीसध्ये काम करताना एवढं लक्ष दिल नाही, पण बाहेर पडल्यावर मात्र सगळे नकोसे विचार परत पिंगा घालायला लागले. काय करवा सुटत नव्हत. पण तेवढ्यात लक्षात आलं की आज दिवसभर टीव्हीवर दाखवत होते, की आज आर. डी. बर्मन यांचा वाढदिवस. ब-याच बॉलिवूडप्रेमींप्रमाणे मीही त्यांची गिनीचुनी गाणी ऐकलेली. 'ओ मेरे दिल के चैन,' 'रिमझिम गिरे सावन', 'तेरे बिना जिंदगीसे कोई शिकवा तो नही', 'चिंगारी कोई भडके' ही आणि अशी तत्सम गाणी माझ्या प्लेलिस्टमध्ये आणि सतत ऐकल्यामुळे आवडलेलीही. पण मग थोडं सर्च करून नेटवरून आणखी दोन - चार गाणी डाऊनलोड केली. आणि आत्तापर्यंत फक्त मुखडा ऐकलेल लता मंगेशकरांच्या आवाजतलं 'मेरी आवाजही पेहचान है', किशोरदांच्या आवाजतलं 'फिर वो ही रात है' आणि अशी गाणी पुन्हा पुन्हा ऐकली. आणि त्यात कधी गुंगून गेले कळलंच नाही. माझा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होईल ते माहीत नाही, पण पंचमदांची अनेक गाणी ऐकत ऐकत माझी कळी कधी खुलली, मूड पूर्ववत झाला कळलंच नाही...
माझ्या आयुष्यात एवढी मस्त गाणी ऐकायला देणा-या 'पंचम'दांना Belated Happy Birthday.. तुमचं काम फक्त फिल्मी गाण्यांपुरतं मर्यादित नव्हतं हे माहित्ये, त्यामुळे तुमची बरीच क्लासिक गाणी ऐकण्यासाठी लौकरच भरपूर वेळ काढणार आहे. तुमच्या मस्त गाण्यांच्या आणि अजरामर संगीताच्या रुपाने तुम्ही आम्हा सर्वांच्या हृदयात नेहमीच रहाल. Happy B'day once again :)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment