वर्षाचा शेवटचा महिना उजाडलाय, सगळीकडे उत्साहाचं, सेलिब्रेशनच वातावरण आहे. मग यात 'बॉलिवूड' तरी कसं मागे राहील? “ टूनपूर का सुपरहीरो” या चित्रपटाच्या निमित्ताने या वर्षाअखेरीस "३डी अॅनिमेशन आणि लाईव्ह अॅक्शन" असा एक वेगळा प्रयोग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आणि या चित्रपटाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटाची जान असलेलं ' अॅनिमेशन वर्क' करणारे सर्व अॅनिमेटर्स मराठी असून हॉलिवूडच्या तोडीस-तोड हा चित्रपट बनला आहे. "क्लाईंब मिडीयाच्या किरीट खुराणा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून कंपनीतील त्यांचे सहकारी अरूण माने, प्रशांत शिकारे, रविराज कुंभार आणि अरविंद शिर्के यांनी अॅनिमेशनची धुरा आपल्या खांद्यावर यशस्वीपणे सांभाळली आहे.
ब्लॉकमध्ये किरीट खुराणा (दिग्दर्शक) - हा चित्रपट म्हणजे आम्हा सर्वांसाठी एक मोठ आव्हान होतं, कारण एक तर अतिशय मोजक्या लोकांच्या सहायाने काम पूर्ण करायच होत . हॉलिवूड सारख्या सगळ्या नवीन टेक्नॉलॉजीही आमच्याकडे उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे हा चित्रपट बनवण्यात आमच्या अॅनिमेटर्सनी सिंहाचा वाट उचलला आहे. दिवस-रात्र मेहनत करून, कधीकधी माझा ओरडा खाऊन, मूड सांभाळून घेतला पण कोणीही बॅक-आऊट नाही केलं, आणि त्यामुळेच हे अवघड आव्हान पेलणं सोप झालं.
या चित्रपटावर गेली ३ वर्ष काम करणारे आणि चित्रपटाच 'प्री-प्रोडक्शनच' , कॅरॅक्ट् र डिझाईनिंग, सीनची लांबी, म्हणजेच शूट होण्यापूर्वी करावी लागणारी पूर्ण तयारी वगैरे सर्व व्यवस्थित सांभाळणारे प्रशांत शिकारे, 'क्लाईंब मिडीया'मध्ये गेली ५ वर्ष काम करत आहेत. घरच्या बेताच्या परिस्थितीमुळे त्यांना अॅनिमेशनच तंत्रशुध्द प्रशिक्षण घेता आलं नाही, पण तरीही या क्षेत्रा त पाऊल टाकल्यावर अनेक गोष्टी शिकत, आत्मसात करत, तर कधी चुका करत ते इथवर पोचले आहेत. 'टूनपूर'बद्दल ते सांगतात की या चित्रपटात " एक ५४ सेकंदाचा सीन आम्हाला सलग( १ टेक ओके) करायचा होता, आणि त्यावेळेस माझी खरी परीक्षा होती, कारण मी आत्तापर्यंत फक्त जाहि रातींसाठी अॅनिमेशन केले होतं, चित्रपटसाठी अॅनिमेशन हा एक नवीन अनुभव होता. मग सीन कसा शूट होणार, कॅमेरा अँगल्स, या सगळ्या गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला आणि तो सीन "१ टेक ओके" केला. हा माझ्यासाठी एक वेगळा आणि आत्मविश्वास देणारा अनुभव होता.
चित्रपटातील 'प्री-प्रोडक्शनच' (pre – production) च्या कामात प्रशांतला मदत करणारा आणि अॅनिमेटेड कॅरॅक्टर्सचे (पात्रांचे) रंग, कपडे, वेशभूषा आणि चित्रपटाती सर्व भागांच कलरिंग सांभाळणारा कोल्हापूरचा रविराज कुंभार हा लहानपणापासूनच खूप सुंदर चित्र काढायचा. घरी सगळेजण कलाकार असल्याने पोषक वातावरणही होते. त्यामुळे त्याने 'कोल्हापूरच्या' कलानिकेतन महाविद्यालयातून ‘फाईन आर्ट्सचा’ ५ वर्षांचा कोर्स पूर्ण केला आणि गेली ३ वर्ष तो 'Climb Media' मध्ये काम करतोय. सेट मॅक्स चॅनलवरचा दिवाना टायगर, अॅतक्शन अण्णा, ब्रिटानिया टायगर अशा अनेक ' निमेटेड' जाहिराती प्रशांतच्या सहाय्याने करणार्या रविराजला 'टूनपूर' मुळे मोठा ब्रेक मिळालाय. यातली सगळी 'अॅनिमेटेड' characters ही आजूबाजूच्या परिसरातल्या आधारलेल्या लोकांवरूनच (observation) करून घेतली आहेत. आणि त्यामुळे त्यांचे कपडे - बोलणं, चालणं, अगदी खरंखुरं वाटतं, ह्याच श्रेय रविराजच्या 'निरिक्षण शक्तीलाच' जातं.
अॅनिमेशन क्षेत्रात गेल्या १३ वर्षांपासून असणारे "अरुण माने" हे "क्लाईंब मिडीया"चे ३डी स्टुडियो प्रमुख तर आहेतच पण या चित्रपटासाठी 'टेक्निकल डिरेक्टर ' म्हणूनही त्यांनी कम पाहिलय. याबद्दल ते सांगतात, अतिशय कमी लोकांना बरोबर घेऊन एवढ्या मोठ्या लांबीचा चित्रपट तयार करणं हे आमच्यासाठी एक आव्हानच होतं. पण तरीही हे आव्हान पेलून एकीकडे या चित्रपटावर(जे आमच एक स्वप्न आहे) काम करत, आम्ही आमच्या नेहमीच्या क्लायंट्सची कामही यशस्वीपणे पूर्णही केली.
या क्षेत्रात येणार्यांनी (तरुणांनी) हे लक्षात ठेवलं पाहिजे की, झोकून देऊन काम करता यायला हवं... जेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या प्रोजेक्ट्वर काम करत असता तेव्हा फक्त ढोर मेहनत करून चालत नाही, तर तुम्हाला तुमच काम अतिशय कल्पकतेने आणि हुशारीने करता यायला हवं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे 'संयम' बाळगणे. आपण खूप मेहनत करून एखाद काम पूर्ण करतो, पण ते समोरच्याला आवडेलच असं नाही अशा वेळेस जो निराश न होता तितक्याच प्रयत्नपूर्वक आणि कामाची गती वाढल्यावरही झोकून देऊन काम करतो तो नक्कीच यशस्वी होतो.
तुमची जर मनापासून भरपूर मेहनत केलीत, तर तुम्हाला यश हमखास मिळतेच, हे या तिघाही मराठी तरुणांच्या उदाहरणावरून हे नक्कीच सिद्ध होत.
ब्लॉक मध्ये (अरविंद शिर्के)- बॅकबोन ऑफ कंपोझिशन डिपार्टमेंट - क्लाईंब मिडियाचे संस्थापक भीमसेन खुराणा यांच्याबरोबर सुरुवातीपासून काम करणारे अरविंद शिर्के कंपोझिशन डिपार्टमेंटचे आधारस्तंभ आहेत. गेल्या २०-२५ वर्षातील तंत्रज्ञानाचा प्रवास जवळून पाहिलेले शिर्के सांगतात, पूर्वी आम्हाला एक सीन शूट करून त्याच एडिटिंग पूर्ण करायला १-२ दिवस सहज लागायचे, पण तेच काम आता अर्ध्या तासाच्या आतच होत. या चित्रपटाबद्दल ते म्हणतात की आधी आमच्या कंपनीने बर्याच अॅनिमेटेड जाहिराती बनवल्या आहेत, पण आता पहिल्यांदाच आम्ही एवढ्या मोठ्या लांबीची ३डी आणि लाईव्ह अॅक्शन फिल्म बनवली आहे. अवघ्या १०-१५लोकांच्या सहाय्याने हे काम करणं म्हणजे एक आव्हानच होतं, पण तरीही या सगळ्या मुलांनी खरच खूप उत्तम काम करून, 'सुंदर' साँग बनवलय, यात शंकाच नाही. (25/12/2010)
No comments:
Post a Comment