कॉमेडी एक्सप्रेसमधल्या धडाकेबाज कॉमेडीप्रमाणेच त्यातला 'बॅन्ड'सुद्धा खूप लोकप्रिय आहे. " लेडीज स्पेशल बॅन्ड" आणि त्या मुली ही बाकीच्या कार्यक्रमातल्या इतर वादकांप्रमाणे फेमस झाल्या आहेत. त्यातलीच एक परफॉर्मर आहे गिटारिस्ट 'सुखदा भावे.' डोंबिवलीत लहानाची मोठी झालेल्या सुखदाने 'रुईया'मधून ग्रॅज्युएशन केलयं, त्यामुळे कलेशी तिचं नातं स्पष्ट होतचं.
५वीत असल्यापासून सुखदाने 'हार्मोनियमचं' शास्त्र शुद्ध प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली, त्यामुळे तिचा क्लासिकलचा बेस तर पक्का झालाच. त्याबरोबरच आवड म्हणून ती गिटार आणि की-बोर्ड सुद्धा वाजवायला लागली. गिटारच प्रशिक्षण तर घेतलं,पंण की-बोर्डवर तिचे हात आपोआपच फिरायला लागले. नवनवीन प्रयोग करत, ती शिकत गेली. घरातील सर्वजण या ना त्या निमित्ताने संगीताशी जोडले गेले असल्याने हे सगळं करत असताना घरच्यांच्या भक्कम सपोर्ट मिळतो, आपल्या या प्रवासाबद्दल सुखदा सांगत असते
आत्ता जरी मी 'शो'जमधून गिटार वाजवत असले तरी मला स्वतःला ' हार्मोनियम' वाजवायला जास्त आवडतं. त्याच शास्त्रशुद्ध प्रशिक्षण मी घेतल नाही, पण तरीही त्यावर नवीन धून तयार करायला, प्रयोग करायला मला जास्त आवडत. लहानपणापासूनच मला संगीताची आवड होती, त्यामुळे कॉलेजमध्ये प्रवेश घेतानाच मी 'म्युझिक कंपोझर' होण्याच नक्की केलं होतं. आणि म्हणूनच 'रुईया'सारख्या कलेशी निगडीत कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन एकांकिकांना ‘म्युझिक’ देणं सुरु केलं. त्याबरोबरच या क्षेत्राची पूर्ण माहिती मिळवण्यासाठी, काम समजून घेण्यासाठी मुंबई युनिव्हर्सिटीमधून 'म्युझिक कंपोझिशन अॅन्ड डिरेक्शन ' आणि ' साऊंड रेकॉर्डिंग असे कोर्सही पूर्ण केले. या कोर्स दरम्यान मला बाकीच्या इतर वाद्यांचीही ओळख झाली व हात बसला. तसंच अनिल मोहिलेंसारख्या मोठ्या माणसांच मार्गदर्शनही मिळालं. आणि त्यामुळेच मी या क्षेत्रात ५-६ वर्षांपासून यशस्वीपणे काम करत आहे. आत्तापर्यंत मी अनेक एकांकिकाना संगीत दिलंय, तसंच निखिल महाजनांच्या 'अंतस्थिती' चित्रपटाबरोबरच त्यांच्या आगामी चित्रपटासाठीही संगीत दिग्दर्शन केलंय. अन् एकीकडे माझ्या स्वत:च्या अल्बमच काम सुरू झालंय, ज्यात आठ गाणी असून हा अल्बम धार्मिक असला तरी त्याला Fusion टच दे ण्यात, आला आहे.
डोंबिवलीत झालेल्या 'पुलोत्सवात' रवींद्रनाथ टागोरांच्या पु. लं. नी अनुवादित केलेल्या कविता संगीतबद्ध करून नृत्य सादर केली होती. तसंच भविष्यात मला स्वत:च्या काही कवितांनाही चाल लावून ' कवितांच्या गाण्यांचा' अल्बम काढण्याचा मानस आहे. आत्तापर्यंतच्या या वाटचालीबाबत मी खुष आहे, कारण मला माझ्या आवडीच्या क्षेत्रात मनाप्रमाणे काम करता येतंय. आणि त्यात घरच्यांबरोबरच या क्षेत्रातील दिग्गजांचाही आशिर्वाद आणि मार्गदर्शन मिळतंय. याबाबत ती सांगते की - एकदा मला प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक 'श्रीनिवास खळे' यांच्या निवासस्थानी जाऊन भेटण्याचा योग आला. आणि तिथे त्यांना काही स्वत: केलेल्या काही रचनाही ऐकवल्या. त्यांनीही बरंच मार्गदर्शन केलं. तो माझ्यासाठी खरंच एक अविस्मरणीय अनुभव होता.
यापुढेही असंच चांगलं काम करत एक उत्तम वादक म्हणून नाव कमवायचं आहे. तिला हार्दिक शुभेच्छा.
No comments:
Post a Comment