Wednesday, November 24, 2010

गोष्ट चांगलीच, पण... 14 Apr 2010, 0022 hrs IST

पाच लाखांहून अधिक विद्यार्थी.. ३०० हून अधिक कोसेर्स.. ६०० हून अधिक संलग्न कॉलेजं... मुंबई विद्यापीठाचा हा व्यापच आता विद्यार्थ्यांची डोकेदुखी ठरु
लागलाय. भ्रष्टाचार, गोंधळ यामुळे गेल्या १५० वर्षांची पंरपरा धुळीत मिळत चाललेल्या या विद्यापीठात आता विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी वेगळे कॅम्पस तयार करण्याचं वारं वाहू लागलंय. अशा पर्यांयामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटतील का, कर्मचारी अधिक कार्यक्षम होतील, की त्यांना भ्रष्टाचाराचं नवं कुरण मिळेल, कोणत्या विद्यार्थ्यांना त्याचा नेमका फायदा होईल, याविषयी बिनधास्त बोलमध्ये विद्यार्थ्यांनी आपली मतं ठामपणे मांडली.

विकेंदीकरणातून विकास

विद्यापीठाच्या शाखा उघडण्याचा निर्णय उपनगरांतल्या मुलांसाठी खूप चांगला आहे. अनेक विद्यार्थ्यांना लेक्चरसाठी विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये जावं लागतं. पावसाळ्यात तर हे खूपच त्रासदायक ठरतं. तसंच विद्यापीठात होणारे अनेक कोसेर्स अशा शाखांमुळे जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचतील. विद्यापीठाच्या विकासासाठीही हा निर्णय खूप चांगला आहे. विकेंदीकरण झालं, तर जास्त विकास होईल.

अदिती धुपकर, डोंबिवली



क्वालिटीचं काय?

विद्यापीठात सध्या अॅडमिनिस्ट्रेटिव्ह कामाचा कचरा झालाय. कालिनाच्या महात्मा फुले भवन म्हणजेच एक्झाम हाऊसमध्ये जो गोंधळ चालतो तो यामुळे काहीसा कमी होईल. पण असं विकेंदीकरण झालं, तर इतर ठिकाणच्या विद्यार्थ्यांना मुंबईत मिळणाऱ्या तोडीचंच शिक्षण मिळेल का, हा पण खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. माझ्या मते इतर ठिकाणच्या विद्यार्थ्यांना ती क्वालिटी नाही मिळणार.

रिंकेश धारोड, एमए पार्ट टू हिस्ट्री

गोंधळात भरच

काय फायदा होणार आहे विद्यापीठाच्या शाखा वाढवून? काहीच नाही. उलट आत्ता जो गोंधळ सुरू आहे, तो दुप्पट तिप्पट वाढेलच. सध्या दोन कॅम्पस असताना लेक्चरचा सगळा भार तसाही कलिना कॅम्पसवरच पडतो. फोर्ट कॅम्पसला विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फार काही होतच नाही. त्यातून विद्यापीठाच्या अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये जो सावळागोंधळ सुरू आहे, त्याचं काय?

मयुरेश कापसे, एमए पार्ट वन

पॉलिटिकल सायन्स

उपनगरातल्या मुलांना फायदा

माझ्या मते हा निर्णय खूप चांगला आहे. कल्याण, भाईंदर किंवा दहिसर, पनवेल अशा ठिकाणी विद्यापीठाच्या शाखा उघडल्यास अनेक विद्यार्थ्यांना खूप बरं पडेल. या व्यतिरिक्त आणखी काय फरक पडेल हे आत्ता सांगणं कठीण आहे. पण, विद्यापीठात चालणारे कोसेर्स इतर शाखांमध्येही चालायला हवेत. बाकी काही फायदा होईल, असं आत्ता तरी सांगण कठीण आहे. तरच त्याचा खरा फायदा विद्यार्थ्यांना मिळेल.

श्रीकला भागवत, एमए मराठी

प्रॉब्लेमच्या मुळाशी जायला हवं

मुंबई विद्यापीठाच्या कारभारात गोंधळ कशामुळे झाला याची चौकशी व्हावी. यापूवीर् जेव्हा विद्यापीठ लोकप्रियतेच्या शिखरावर होतं तेव्हा विकेंदीकरणाची गरज वाटली नव्हती. मुद्दा हा, की तिथल्या कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉश केलं पाहिजे. कॅम्पस वाढवणं चांगलं आहेच. पण, प्रॉब्लेमच्या मुळाशी जाऊन शोध घेतला पाहिजे. नाहीतर, कलिनापुरता मर्यादित असलेला विद्यापीठाचा गोंधळ उपनगरातही पसरेल. त्यानंतर मात्र मागे फिरण्याचा ऑप्शन बंद झाला असेल.

अनिकेत माने, एमए समाजशास्त्र

भ्रष्टाचाराचं नवं कुरण

विद्यापीठाचं विभाजन होतंय हे प्रशासकीय कामकाजासाठी चांगलं आहे. कारण विद्यापीठाचा आवाका मोठा आहे. कार्यपद्घती सुरळीत होण्यासाठी अशा विभाजनाची गरज आहे. त्यानिमित्ताने गोंधळ तरी कमी होईल. पण भ्रष्टाचाराला नवीन जागा मिळणार हे नक्की.

पियुष झा, एमबीए स्टुडण्ट

दजेर्दार अभ्यासक्रम हवा

विद्यापीठाचं विभाजन झालं, तरी शिक्षणाचा दर्जा सुधारणार आहे का? नवी विद्यापीठांबरोबरच चांगल्या सुविधा आणि दजेर्दार अभ्यासक्रमांसाठी प्रयत्न होऊन तशा स्वरुपाचा प्रस्ताव आल्यास बरं होईल.

अन्वया खडेर्, मास्टर इन जर्नालिझम र्फस्ट इयर

चांगला निर्णय

विभाजनाचा निर्णय चांगला आहे. मुंबई विद्यापीठाला विभाजनाची खरोखर गरज आहे. यामुळे गुंतवणूक, कार्यक्षमता तसंच शिक्षणाच्या दर्जामध्ये नक्कीच सुधारणा होईल.

धनश्री पाताडे, मास्टर इन जर्नालिझम

सेकण्ड इयर

संवाद चांगला हवा

विभाजनामुळे कार्यपद्घतीत सुधारणा आली, तरी नव्या कॅम्पसला नाव नसेल. त्यामुळे परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अडचण होऊ शकते. नव्याने निर्माण होणाऱ्या कॅम्पसचं आणि मूळ मुंबई विद्यापीठांचं कम्युनिकेशनही उत्तम असायला हवं. नाहीतर, मुलांचे हाल होतील, हे नक्की.

राजेश महाजनी, एमए इकानॉमिक्स

वेळेची बचत

आम्ही रुपारेल कॉलेजमधून एमएससी करत असलो, तरी थिअरीसाठी सर्व कॉलेजचे विद्याथीर् कलिनालाच एकत्र जमतात. म्हणजे प्रॅक्टिकल एकिकडे आणि थिअरी दुसरीकडे असते. अशा वेळेस जाण्या-येण्यातच खूप वेळ जातो. मग अभ्यास तरी कधी करणार? पण जर ठाण्यासारख्या मध्यवतीर् ठिकाणी कॅम्पस झालं तर प्रॅक्टिकल आणि थिअरी एकत्र करता येईल. त्यामुळे उपनगरात राहणाऱ्यांचा बराच वेळ वाचेल, तोच वेळ अभ्यासासाठी वापरता येईल.

रेणुका फणसळकर, एमएससी, रुपारेल कॉलेज

हजेरी वाढण्यास मदत

कल्याण , डांेबिवलीला विद्यापीठाची सब सेण्टर्स असली, तरी तिथे फक्त अॅडमिशन होऊ शकते. पण स्टडी मटेरियल, हॉल-तिकीट अशा अनेक गोष्टींसाठी वा लेक्चरसाठी कल्याण, बदलापूर किंवा त्यापुढे राहणाऱ्यांना खूप लांब यावं लागतं. कॅम्पसचं विकेंदीकरण झालं तर खूप वेळ वाचेल. त्यामुळे हजेरी वाढेल. नोकरी करणाऱ्यांना किंवा काही अडचणी उद्भवल्या तर या कॅम्पसचा उपयोग होऊ शकतो.

मिनल निजसुरे, एम.कॉम, करस्पॉडन्स,

व्यवस्थापनावरचा ताण कमी होईल

हे विभाजन झालं तर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरचा ताण कमी होईल. तसंच जवळच्या अथवा मध्यवतीर् ठिकाणी विद्यापीठ असल्याने नोकरी करणारे आणि तिथे राहणारी मुलं लेक्चरला रेग्युलरली जाऊ शकतील. याचा फायदा पावसाळ्यात जास्त होईल.

श्रेयस राऊत, एमएससी.

मुलांची संख्या वाढेल

विद्यापीठाचा स्टाफ मोठा आहे. को-ऑॅपरेटिव्हही आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मुलांना कॉलेज अटेण्ड करायचं असतं. पण प्रवास मोठा असल्याने अनेक अडचणी असतात. विद्यापीठाच्या शाखा वाढल्या तर मुलांची संख्या वाढेल.

अपूर्वा कुलकणीर्, पोस्ट ग्रॅज्युएशन, ट्रॅव्हल-टुरिझम.

.

हॉस्टेलचा खर्च वाचेल

पोस्ट-ग्रॅज्युएशन लेव्हलला एक-दोन लेक्चर्स असतात, त्या एक-दीड तासाच्या लेक्चरसाठी रोज तीन-साडेतीन तास प्रवास करण्यात घालवावे लागतात आणि संेट्रलच्या लोकांना पावसाळ्यात ट्रेन्समुळे खूपच त्रास होतो. कित्येक मुलं तर प्रवास वाचवण्यासाठी हॉस्टेलमध्येही राहतात, त्यांचाही खर्च कमी होईल.

निलेश आवारी, एमएससी.

संवाद वाढेल

एकाच वेळी अनेक कोसेर्स सुरु असल्याने लाखांेच्या संख्येने विद्याथीर् युनिव्हसिर्टीत शिकतात. आणि त्यामुळेच तिथल्या कर्मचाऱ्यांवर मोठा ताण येतो. पर्यायाने विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होतं. या विभाजनामुळे शिक्षक व कर्मचारी आणि मुलं यांच्यात संवाद वाढेल.

पवन यादव, एमएससी, करस्पॉडन्स

कार्यक्षमता वाढेल

मुंबई विद्यापीठाचा पसारा मोठा आहे. कार्यक्षेत्रं लांबवर पसरल्यामुळे विद्यार्थ्यांना लहान-सहान कामांसाठी कलिना कॅम्पसपर्यंत यावं लागतं. विद्यापीठाची केंद सुरु झाली, तर विद्यार्थ्यांचे कष्ट आणि वेळ वाचेल. त्याचप्रमाणे सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवरचा कामाचा ताण हलका होईल. त्यामुळे कदाचित त्यांची कार्यक्षमतासुद्घा वाढेल.

अमरीश पवार, एमएससी फिजिक्स,

भवन्स कॉलेज

केंदं नेटकी असावीत

विभाजनापेक्षा केंद सुरु करून ती नीट आणि पद्धतशीरपणे चालवावीत. अनेक कॅम्पस सुरु केल्याने नुकसान अधिक होईल. एखादी बँक नवी शाखा काढते तेव्हा ती आपलं नाव बदलत नाही. त्याप्रमाणे विद्यापीठाने केंदं सुरु करावित. शिवाय, या नव्या केंदाना स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जाही नसावा.

स्नेहा सराफ, एमएससी, लाइफ सायन्स



No comments:

Post a Comment