'प्रकल्प' हा टेक्निकल फेस्टिवल
३ एप्रिल रोजी पार पडला. मुंबई तसंच महाराष्ट्रातील इतर कॉलेजांमधील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रोजेक्ट्सचं प्रदर्शन यावेळी मांडण्यात आलं होतं. वायरलेस ऑटोमॅटिक रेल्वे क्रॉसिंग गेट, स्पाय रोबोट, हायवे स्पीड सेन्सिंग, मल्टिपल फेस डिटेक्शन यासारखे अफलातून प्रोजेक्ट्स ठेवण्यात आले होते. मात्र, आकर्षणबिंदू ठरला तो यश मुळगावकरने तयार केलेला 'रोबोटिक आर्म'. मानेच्या हालचालीनुसार या हाताची हालचार ठरते. पाणी पिणं, खाणं, वस्तू (अर्ध्या किलो वजनापर्यंतच्या) उचलून दुसरीकडे ठेवणं अशी कामं हा रोबोटिक आर्म सहज करतो.
एका हाताने अपंग असणाऱ्या व्यक्तींसाठी अशा स्वरुपाचा हात नक्कीच उपयुक्त ठरू शकतो. या रोबोटिक आर्मचं वैशिष्ट्य म्हणजे हा धातूचा हात बसवण्यासाठी कोणत्याही महागड्या ऑपरेशनची गरज नाही. प्राथमिक स्थितीत असणारा या रोबोटिक आर्ममध्ये अधिक सुधारणा करून या वर्षअखेरीस तो बाजारात आणण्याचा हेतू असल्याचं यश सांगतो. सध्या प्रोजेक्ट म्हणून हा आर्म बनवण्यात आला असला, तरी त्याला व्यावसायिक स्वरुप देण्यात येईल. या आर्ममुळे अपंगांना खऱ्या अर्थाने मदतीचा हात मिळाला आहे, असं म्हणायला हरकत नाही.
सुपरफास्ट
रोबोटिक आर्मप्रमाणेच ओरियन रेसिंग कारनेही उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं. फॉर्म्युला वनमधील गाड्यांसारखीच ही रेसिंग कार आहे. या गाडीमध्ये अधिकाधिक अचूकता आणण्यात आली असून गेल्या वषीर् जर्मनीमधील सोसायटी ऑफ ऑटोमोटिव इंजिनीअर्सतफेर् घेण्यात येणाऱ्या स्पधेर्मध्ये बक्षीसही मिळवलं होतं. या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे वळण घेताना गाडीचा वेग खूप कमी करावा लागत नाही.ं
मदतीचा रोबोहात
रोबोटिक आर्म भविष्यात अतिशय उपयोगी ठरेल. अपंगांसाठी हा आर्म खूप उपयुक्त ठरू शकतो. पेशण्ट्सवर याचा प्रयोग करून प्रत्यक्षात काय अडचणी येऊ शकतात, ते कळेल आणि त्यानुसार पुढील पावलं उचलली जातील असं कॉलेजचे प्रोफेसर मिलिंद मराठे यांनी सांगितलं.
-मीनाक्षी कुलकर्णी
No comments:
Post a Comment