Wednesday, November 24, 2010

वादच नाय 25 Nov 2010, 0014 hrs IST

कट्ट्यावर बोलबच्चन देणारे, मस्का मारून समोरच्याला पटवणारे असे सगळेच जण कॉलेज फेस्टिव्हलमध्ये आपले हिडन टॅलेण्ट्स वापरत असतात. मल्हार, उमंग, मूड-आयस
ारखे फेस्टिव्हल्स हिट ठरण्यामागे अशाच अत्रंगी पण, हुश्शार कॅरेक्टर्सचा हात असतो. माकेर्टिंग, हॉस्पिटॅलिटी, सिक्युरिटी अशा वेगवेगळ्या टीम्स या फेस्टसाठी राबत असतात. हाच फॉर्म्युला तुम्ही वापरला, तर तुमचा कॉलेज फेस्टिव्हलही रॉकिंग होईल यात वादच नाय!!!

' यार, यंदाचा मल्हार काय मस्त होता ना' किंवा 'छ्यॅ, या वेळी त्या फेस्टला इतकी मजा नाही आली,' असे अनेक प्रकारचे शेरे प्रत्येक कॉलेज फेस्टिव्हलनंतर ऐकायला मिळतात. पण, एखादा फेस्टिव्हल आयोजित करण्यासाठी त्या-त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी खूप परिश्रम घेतलेले असतात, याचा या शेरेबाजांना अनेकदा विसर पडतो. कॉलेज कोणतंही असो; फेस्टिव्हल हा त्या कॉलेजचा मानबिंदू समजला जातो. तो चांगला व्हावा, यासाठी कॉलेजचे काही विद्याथीर् महिनो न् महिने तयारी करत असतात.

कॉलेज फेस्टिव्हलची तयारी सुरू होते, ती वेगवेगळी कामं करणाऱ्या ग्रुपच्या निवडीतून! यात इन्फ्रास्ट्रक्चर, सिक्युरिटी, हॉस्पिटॅलिटी, माकेर्टिंग, मीडिया अशा अनेक टीम्सचा सहभाग असतो. त्या टीमची कामं, त्यांच्या को-ऑडिर्नेटर्सचा अनुभव आणि त्या अनुभवातून त्यांना मिळालेलं शहाणपण याची बाकीच्यांना कल्पनाही नसते. ते शहाणपण आणि तो अनुभव विविध कॉलेजांमधील काही को-ऑडिर्नेटर्सच्याच शब्दांत...

आमच्या टीमचं काम गेल्या चार-पाच वर्षांत खूपच वाढलंय. पब्लिसिटी टीम आणि आम्ही हातात हात घालून कामं करतो. कॉलेजच्या फेस्टिव्हलला आणि पर्यायाने कॉलेजला प्रसारमाध्यमांद्वारे प्रसिद्धी मिळवून देणं, हे आमच्या टीमचं मुख्य काम असतं. त्यासाठी मीडियाच्या अभ्यासाची खूपच गरज असते. फेस्टिव्हलची थीम मीडियाद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं, तसंच एखाद्या पेपरसोबत किंवा न्यूज किंवा रेडिओ चॅनलसोबत टायअप करणं यात आमचा महत्त्वाचा वाटा असतो. इव्हेण्टला जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी आमची टीम सतत झटत असते. त्यामुळे मीडियात वावरणाऱ्या माणसांशी कसं बोलावं, वागावं, याचं उत्तम ज्ञान मिळतं. भविष्यात एखाद्याला त्या क्षेत्रात करिअर करायचं असेल, तर त्याच्या ओळखीही होतात.

रिद्धी गोळवणकर, भवन्स

अॅन्युअल फेस्टिव्हलसाठी कॉलेजकडून मोठं बजेट मिळणं कठीण असतं. अशा वेळी फेस्टिव्हल झोकात पार पाडण्यासाठी प्रायोजक मिळवावे लागतात. यासाठी फेस्टिव्हलआधी आठ-नऊ महिने आधीपासून आम्ही मेहनत करत असतो.

प्रायोजक शोधणं, त्यांच्यासमोर फेस्टिव्हलची थीम सादर करणं आणि मग, त्यांच्याकडून स्पॉन्सरशिप मिळवणं हे सगळं आम्ही बघतो. स्पॉन्सर्स आणि कॉलेज या दोघांच्या दृष्टीने ते फायद्याचं असतं. दुसरा फायदा म्हणजे अनेक कंपन्या कॅम्पसवर येतात. त्या आपले काही इव्हेण्ट्सही ठेवतात. त्याचाही फायदा क्राऊडला होतो. व्यक्तिश: म्हणाल, तर माझी कम्युनिकेशन स्किल्स वाढायला माझ्या को-ऑडिर्नेटरशिपची खूपच मदत झाली. २४ जण मिळून एक ग्रुप म्हणून काम करणं हेसुद्धा खूप शिकवून जातं. तुमच्यात टीम स्पिरिट वाढतं. स्पॉन्सरर्ससमोर प्रेझेण्टेशन केल्याने सादरीकरणाचं कौशल्यही वाढतं.

अभिषेक कोरी, साठ्ये

एखाद्या फेस्टिव्हलची थीम ठरल्यानंतर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं, हे आमचं काम असतं. त्यासाठी आम्ही फेस्टिव्हलच्या सात-आठ महिने आधी कामाला लागतो. त्या थीमशी निगडीत पोस्टर्स, ब्रोशर्स, पॅम्प्लेट्स बनवून घेणं, ती योग्य ठिकाणी पोहोचवणं आदी सगळी काम करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस झटतो. आता तर सोशल नेटवकिर्ंग साइटवर फेस्टिव्हलचं पेज वगैरे तयार केलं, तरी खूप पब्लिसिटी होते.

फेस्टिव्हलची पब्लिसिटी करण्यासाठी त्याच्याशी निगडीत इव्हेण्ट्स ऑर्गनाइझ करण्यातही अनेकदा आमचा हातभार असतो. फेस्टिव्हल होतो, हे अनेक कॉलेजांमध्ये माहिती असतं पण, त्यात नवीन काय हे सांगण्याचं काम पब्लिसिटी टीम करते. तसंच नवनवीन कॉलेजांनी फेस्टिव्हलमध्ये भाग घ्यावा, याकडेही ही टीम लक्ष ठेवून असते. पब्लिसिटी टीममध्ये काम करून टीमवर्कचा चांगला धडा मला मिळाला. काहीतरी शिकणं, हे तर होतंच असतं. पण, त्याहीपेक्षा जास्त म्हणजे एकत्र येऊन मजा कधीच विसरणं शक्य नाही.

रोहित श्रॉफ, आयआयटी

गेली दोन वर्षं मी हॉस्पिटॅलिटीचं काम सांभाळतेय. संपूर्ण फेस्टिव्हलमध्ये येणाऱ्या परीक्षकांचं, सेलिब्रिटींचं आदरातिथ्य करणं, त्यांच्या आणि सगळ्या व्हॉलेंटिअर्सच्या खाण्यापिण्याची जबाबदारी हॉस्पिटॅलिटी टीमवर असते. इव्हेण्टच्या ठिकाणी पाण्याच्या बाटलीपासून स्नॅक्सपर्यंत सगळ्या खाण्यापिण्याच्या गोष्टी व्यवस्थित गेल्या की नाही, ही जबाबदारी आमची असते. त्याशिवाय बॅकस्टेज आटिर्स्टची सगळी व्यवस्था बघावी लागते. फेस्टिव्हलसाठी हॉस्पिटॅलिटी टीममध्ये काम करून टाइम मॅनेजमेण्ट जमू लागलं. तसंच तुमच्या कामात एवढीही चूक चालणार नसल्याने आपोआप 'पफेर्क्शन' येत गेलं. या टीममध्ये काम केल्यानं तुम्ही उत्तम 'होस्ट' बनू शकता. त्यामुळे भविष्यात कोणतंही काम करताना दडपण निश्चितच जाणावणार नाही.

पृथा दावडा, सोमय्या कॉलेज

' मल्हार'सारख्या मोठ्या फेस्टिव्हलसाठी हॉस्पिटॅलिटीचं काम सांभाळणं खूपच आव्हानात्मक असतं. मुंबईबाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या राहण्याची, खाण्यापिण्याची सोय बघणं, त्यांना रिसिव्ह करणं, हॉटेल बुक करणं, आवश्यक ती मदत पुरवणं अशी अनेक कामं आम्हाला करावी लागतात. त्याशिवाय कॉलेजमधल्या व्हॉलेंटिअर्सची सोय करणं, कॅटरर्स ठरवणं वगैरेही कामं आमचीच असतात. ही सगळी काम करताना माझा झालेला फायदा म्हणजे माझा संयम खूप वाढला. तसंच अनेक समस्या हाताळायला शिकले.

हेन्ना खेमानी, सेण्ट झेविअर्स कॉलेज

आमचं काम सुरू होतं, ते फेस्टिव्हलच्या दिवशी! कॉलेजमध्ये फेस्टिव्हलदरम्यान पूर्ण सुरक्षा ठेवणं हे या टीमचं काम. त्यासाठी आमच्याकडे व्हॉलेंटिअर्सची खंदी टीम तयार असते. आत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची तपासणी करून मगच त्यांना सोडलं जातं. फेस्टिव्हलदरम्यान डीओडरण्ट, टोकदार वस्तू, पावडर, बाटल्या अशा गोष्टी कॅम्पसमध्ये जाणार नाहीत, याची काळजी आम्ही घेतो. त्यासाठी बूटांपासून कमरेच्या पट्ट्यापर्यंत सगळ्या गोष्टी तपासण्याचं काम आमच्या हाती असतं. अनेक कॉलेजांमध्ये तर सिक्युरिटी टीमला फायर फायटिंग ट्रेनिंगही दिलं जातं. सिक्युरिटी टीम ही फेस्टिव्हलसाठी महत्त्वाची असते खासच! संपूर्ण इव्हेण्ट सुरळीत पार पडण्याची जबाबदारी आमच्यावर असते. आम्हाला फेस्टिव्हलची मजाही धड लुटता येत नाही पण, त्याबाबत आमची तक्रार नाही. कारण आपल्यामुळे इतर विद्याथीर् एन्जॉय करतात, याचंच समाधान मोठं असतं. झटपट निर्णय घेणं हे याचमुळे आम्हाला शिकायला मिळतं, ते वेगळंच!

राजीव अभंग, रुईया कॉलेज
संकलन : मधुरा आपटे, मीनाक्षी कुलकर्णी
कॉलेज क्लब रिपोर्टर

No comments:

Post a Comment