Wednesday, November 24, 2010

आवाज दो... कहाँ है? 25 Nov 2010, 0014 hrs IST

नोव्हेंबर महिना संपत आला तरी कॉलेजेसमध्ये जीएस नसल्याने स्टुडण्ट्सना त्याची उणीव भासतेय. फेस्टिव्हल्स तोंडावर असताना ' मुंबई
टाइम्स'ने यावर प्रथम आवाज उठवला. विद्यार्थ्यांनीही बिनधास्तपणे आपल्या प्रतिक्रिया यातून व्यक्त केल्या. 'आम्हाला आमचा हक्काचा आवाज द्या' अशी जोरदार मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. तसंच युनिव्हसिर्टी आणि विद्याथीर् नेत्यांनीही याबाबत आपली भूमिका 'बिनधास्त बोल'मध्ये मांडली आहे.

जीएस हवाच

मुळात दरवषीर् जीएसची निवड ही कॉलेजांमध्ये गणेशोत्सवाच्या आधी होत असते. गेल्या वषीर्ही असा प्रॉब्लेम झाला होता पण त्याची फारशी चर्चा झाली नाही. यंदाही एकूण परिस्थिती पाहता जीएसच्या निवडीला डिसेंबरअखेर किंवा जानेवारीच उजाडेल असं वाटतं. खरं तर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कॉलेजेसमध्ये अनेक इव्हेण्ट्स, फेस्टिव्हल्स होत असतात. त्यामुळे तेव्हा जीएस असणं आवश्यक असतं. स्टुडण्ट्सचं म्हणणं पोहोचवणं हे जीएसचं प्रमुख काम. जीएसची निवड कॉलेज सुरू होतात तेव्हा म्हणजे जुलै महिन्यातच होऊ शकली तर अनेक अॅक्टिव्हिटींच्या दृष्टीने त्यांचा उपयोग होतो. पण तरीही जीएस असणं हे मात्र आवश्यक आहेच. युनिव्हसिर्टीने जुलै-ऑगस्ट महिन्यातच ही प्रोसेस पूर्ण करून जीएसची निवड करून घेतली पाहिजे. कारण जीएस हा विद्यार्थ्यांचा आवाज आहे हे नक्की आणि तो कोणत्याही परिस्थितीत दाबला जायला नको.

आदित्य शिरोडकर
अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
...........................................................

इंजिनीअरिंग अॅडमिशन्समुळे उशीर

गेली अनेक वर्षं जीएसची निवडणूक प्रक्रिया सर्वसमावेशक व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते. यंदा इंजिनीअरिंगच्या प्रवेशप्रक्रियेला खूप उशीर झाला. इतर कॉलेजांप्रमाणे इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनाही प्रोसेसमध्ये आणणं गरजेचं होतं. यामुळेच यावषीर् जीएसची निवडणूक लांबली. यात कोणत्याही प्रकारचं राजकारण असण्याचा प्रश्नच नाही. जीएसचा रोल फक्त फेस्टिव्हल्सपुरता मर्यादीत असतो हा दृष्टीकोन न ठेवता तो एकूणच एज्युकेशनल मूव्हमेण्टचा भाग असतो असं आम्हाला वाटतं. पण युनिव्हसिर्टी अॅक्टप्रमाणे कोणत्याही राजकीय गोष्टी निवडणुकांमध्ये आणायला उमेदवारांना परवानगी दिली जातं नाही. त्यामुळे फक्त इंजिनीअरिंगच्या अॅडमिशन प्रक्रियेमुळे हा उशीर झालाय. निवडणुकांचं र्सक्युलर एकदाच निघतं. एका वर्षात दोनदा निवडणुका घेणं शक्यही होतं नाही.

मृदूल निळे
डायरेक्टर (डिपार्टमेण्ट ऑफ स्टुडण्ट वेल्फेअर)

...........................................................

राजकारण्यांचं शक्तीप्रदर्शन

जीएस म्हणजे विद्यार्थ्यांचा आधारस्तंभ. परंतु जीएसच्या निवडणुकीमागे मुंबई युनिव्हसिर्टीचा काही डाव असेल असं मात्र वाटत नाही. युनिव्हसिर्टीला आधीच इतके व्याप आहेत की कदाचित त्यातून ही निवडणूक राहून गेली असेल. जीएस नसल्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अडचणी मांडता येत नाहीत हे मात्र खरं. फेस्टिव्हलच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांचं आयोजन ज्यांना करायचं आहे ते करणारच. प्रत्येकाला वाटतं की आपण फेस्टिव्हल हेड असावं पण ते शक्य होऊ शकत नाही. त्यामुळे हे असे राडे होत असतात. अशा राड्यांमागे राजकारण्यांचं शक्तीप्रदर्शनच होत असतं. जीएस असल्यामुळे त्याला थोड्याफार प्रमाणात आळा बसतो हे मात्र खरं. विद्यार्थ्यांना याचा काही फरक पडत नाही. कारण त्यांना हे राडे पचवण्याची सवय झाली आहे. फेस्टिव्हलमध्ये असे राडे केल्यानेच रंगत येते. ती येण्यासाठीच असे प्रकार घडवावे लागतात. पण म्हणूनच जीएस असल्या-नसल्याने फारसा फरक पडत नाही.

मीनाक्षी पवार
मुंबई युनिव्हर्सिटी

...........................................................

भार कल्चरल लीडर्सवर

आतापर्यंत दिवाळीची सुट्टी असल्याने काही प्रॉब्लेम नव्हता. पण आता कॉलेजेस सुरू होतील आणि अजूनही जीएसचा पत्ता नाही. अवघ्या महिनाभराच्या अंतरावर आलेल्या कॉलेज फेस्टिव्हल्सच्या तयारीबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे. जीएस नसल्यामुळे आमच्या कॉलेजच्या सगळ्या कल्चरल अॅक्टिव्हिटीजचा भार दोन कल्चरल लीडर्सवर पडतोय. कॉलेजबाबत स्टुडण्ट्सना जाणवणारे सगळे प्रॉब्लेम तसेच रेंगाळत पडले आहेत.

आदित्य काळे
एफवायबीकॉम, सीएचएम कॉलेज

...........................................................

फेस्टिव्हल्सचं प्लॅनिंग रखडलं

जीएसच्या नेमणुकीला होणाऱ्या उशिरामुळे फेस्टिव्हल्सचं प्लॅनिंग बोंबलतंय. जबाबदारी कुणी घ्यायची हेच ठरलेलं नसल्याने वेळ फुकट चालला आहे. कॉलेजची लेक्चर्स वेळेवर न होण्यामुळे अभ्यासावर आणि प्रोजेक्ट्सवर त्याचा परिणाम झाला आहे. या साऱ्याबाबत बोलणारं मात्र कुणीच नाही.

सुशील अहिरे
टीवायबीएमएम, एस.के.सोमय्या कॉलेज

...........................................................

माहिती मिळत नाहीय

आधी फेस्टिव्हल्स महिनाभर तरी चालायचे. पण आता ते चार-पाच दिवसांतच उरकले जातात. फेस्टिव्हल्सची माहिती विद्यार्थ्यांना नीट मिळत नाही. एकांकिका वगैरे कधी होतात ते कळत नाही. जीएसच नसल्यामुळे आमच्यापर्यंत ही माहिती अधिकृतपणे पोहोचत नाही.

मधुरा कुलकर्णी
टीवायबीकॉम, पेंढारकर कॉलेज

...........................................................


नेतृत्वाचा प्लॅटफॉर्म

कॉलेज प्रशासन आणि विद्यार्थी यांच्यातला प्रभावी दुवा म्हणजे निवडून आलेला प्रतिनिधी. विद्याथीर् आणि कॉलेज प्रशासन यांच्यात विचारांचं आदानप्रदान प्रभावी होण्यासाठी विद्यार्थी संघटनांचं अस्तित्व महत्त्वाचं असतं. या शैक्षणिक वर्षात जीएसच्या निवडणुका लांबणीवर टाकून विद्यार्थ्यांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न केल्याच्या मुद्द्यात तसं काही तथ्य वाटत नाही. जीएस निवडणुकांना राजकिय किनार लाभल्याने त्या पारदर्शकतेपासून मात्र दूर गेल्या आहेत असं विद्यार्थ्यांना वाटतंय. या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांमधली धनदांडग्यांची मुलं पैशांच्या जोरावर निवडून येतात. त्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या प्रश्नांशी फारसं देणंघेणं नसतं. सर्वच राजकीय पक्ष तरुणांना डोळ्यांसमोर ठेवून पडद्यामागून कॉलेज निवडणुकांमध्ये प्रवेश करून आपल्या पोळ्या भाजून घेतात. हे कुठेतरी थांबायला हवं. जीएसच्या निवडणुकांमधून विद्यार्थ्यांना नेतृत्व करण्यासाठी व्यासपीठ मिळतं हे मात्र नक्की.

अंकुर मयेकर

...........................................................

प्रश्न कुणासमोर मांडायचे?

जीएस नसल्याचा मुख्य तोटा फेस्टिव्हल्सना होणार आहे. अद्याप फेस्टिव्हल्सची तयारी बिलकूल होऊ शकलेली नाही. विद्यार्थ्यांमध्ये अंतर्गत राजकारण वाढलेलं असून त्याचा परिणाम उत्साही विद्यार्थ्यांच्या कामावर होतोय. लिफ्ट सुरू नसणं, क्लासरुम कॅण्टिनपासून दूर असणं असे अनेक प्रॉब्लेम्स विद्यार्थ्यांना जाणवत असतात. ते योग्य त्या फोरमवर जीएसच मांडू शकतो असं मला वाटतं. पण जीएसची नेमणूकच अद्यापि न झाल्याने हे प्रश्न कुणासमोर मांडायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

पल्लवी आपटे

संकलन :
मीनाक्षी कुलकर्णी
कॉलेज क्लब रिपोर्टर

No comments:

Post a Comment